शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे घर कधी सजणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:02 IST

गोपाल डाहाके ।आॅनलाईन लोकमतमोर्शी : ब्रिटिशकाळात निर्मित मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अनेक वर्षांपासून डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आली नाही. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा भाड्याच्या घरात राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, पोलिसांच्या मालकीची १२ एकर जागा बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाच्या बाबतीत दूरवस्था ...

ठळक मुद्देस्वातंत्र्यापूर्वीची वसाहत : मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था

गोपाल डाहाके ।आॅनलाईन लोकमतमोर्शी : ब्रिटिशकाळात निर्मित मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अनेक वर्षांपासून डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आली नाही. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा भाड्याच्या घरात राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, पोलिसांच्या मालकीची १२ एकर जागा बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाच्या बाबतीत दूरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पोलिसांच्या सदनिकेची डागडुजी केली नाही. सदनिकांवरील कवेलू फुटले आहेत. पावसाळ्यात छप्परावर ताडपत्री टाकून पाण्यापासून बचाव करावे लागतात. नाल्या तुंबणे, भिंतीचे प्लास्टर खराब यासह अनेक समस्या कायम आहेत.ठाणेदारांच्या निवासस्थानाची व्यवस्था खराब झाली आहे. घराचे दरवाजेसुद्धा पूर्णपणे बंद होत नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची स्थिती त्याहीपेक्षा बिकट झालेली आहे. तसेच मोर्शी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हिवरखेड व मोर्शी भाग अतिसंवेदनशील आहे. येथे अनुचित प्रकार घडल्यास पोलीस कर्मचार्यांना तत्काळ बंदोबस्तासाठी जावे लागते. मात्र, अनेक पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात भाड्याने राहत असल्यामुळे त्यांना तैनात होण्यास उशीर होतो.नव्या घराची प्रतीक्षामोर्शी ठाण्यातील एक पीआय, चार एपीआय, आठ महिला पोलीस कर्मचारी व ५२ पुरुष कर्मचारी आहेत. गृहविभागाने मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांसाठी नवीन घरे निर्माण करावी, अशी मागणी पोलीस कर्मचारी वर्तुळातून होत आहे.भाड्यापोटी लाखोंचा खर्चमोर्शी पोलीस ठाण्याच्या आवारात बहुमजली पोलीस निवासस्थान तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यासाठी निवासस्थाने निर्माण होणे गरजेचे आहे. मोर्शी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होऊन जवळपास १५ ते १७ वर्षे झाले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारीसुद्धा भाड्याच्या घरात राहत आहेत. या भाड्यापोटी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत.