शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कैदेतील पोपट कधी घेणार भरारी?

By admin | Updated: August 13, 2016 00:09 IST

वनजीव कायद्यानुसार पोपट किंवा अन्य कोणताही पक्षी बंदिस्त करून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे.

अनेक ठिकाणी बंदिस्त : वन्यजीव कायद्याचे उल्लंघनवैभव बाबरेकर  अमरावतीवनजीव कायद्यानुसार पोपट किंवा अन्य कोणताही पक्षी बंदिस्त करून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, शहरातील बहुतांश घरात आजही पोपटांना पिंजऱ्यात कैद केल्याचे दिसून येते. त्यामुळे परंपरागत चालणारी पोपटांची कैदेची मालिका कधी संपणार, असा सवाल वन्यप्रेमी उपस्थित करीत आहेत. ृवनकायद्याची सर्रास पायमल्ली होत असताना वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. पोपट हा पाळीव पक्षी आहे. मनुष्याचे अनुकरण करून तसेच शब्दोच्चार करणे, हे पोपटाचे वैशिष्ट्य. त्यामुळे घरोघरी पोपटाला पिंजऱ्यात कैद करून पाळण्यावर भर दिला जातो. मात्र, पोपट हा वन्यजीव अधिनियमात मोडणारा पक्षी आहे. पोपटाला बंदिस्त करून ठेवणे हे वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन ठरते. हा बोलका वन्यजीव अधिक काळ एकाच घरात असल्यास तो घरातील मंडळींना नावाने हाक मारतो. त्यामुळे तो सर्वांच्याच आवडीचा पक्षी बनला आहे. मात्र, त्याला शोभेची वस्तू म्हणून कैद करून ठेवणे हा अपराध ठरतो. ही बाब वनविभागाला माहीत असतानाही कोणतीच कारवाई केली गेली नाही. आणखी किती दिवस पोपटांना बंदिस्त राहून जीवन जगावे लागेल, असा प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोपटांचीही तस्करी पोपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी केली जात असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील काही शिकारी पोपटांची घरटी शोधून त्यांची पिल्ले गोळा करतात आणि पालनपोषण करून त्यांची विक्री करतात. ‘लव्हबर्ड’सारख्या पक्ष्यांच्या आड पोपटांचीही विक्री जिल्ह्यात होत असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे या तस्करांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींची आहे. काय म्हणतो वन्यजीव अधिनियम ?भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची १ व २ मध्ये येणारा पोपट हा पक्षी अनेक घरांमध्ये पिजऱ्यांत बंदावस्थेत आढळून येतो. वास्तविक पोपटला कैद करून ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास पोपट पालकाला ३ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षासुद्धा होऊ शकते. मात्र, तरीसुद्धा बहुतांश परिसरातील घरांमध्ये पोपट पिजऱ्यांत बंदिस्त असल्याचे आढळून येतात. मात्र, आजपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. याकडे वनविभागाचे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे, हे विशेष. वनविभाग, वन्यप्रेमींनी एकत्र येऊन पोपटांना स्वतंत्र केले पाहिजेत. किती पोपट बंदिस्त आहेत, हे तपासून पहावे, जे नागरिक बंदिस्त पोपटांना सोडण्यास इच्छूक नसेल, अशांवर वनविभागाने कारवाई करावी. - यादव तरटे, पक्षी अभ्यासक पोपटाला बंदिस्त ठेवणे हा वन्यजीव कायद्यात गुन्हा आहे. यासंदर्भात जनजागृती करून नागरिकांना समजाविणे गरजेचे आहे. वनविभागाकडून कॅम्प घेऊन पोपटांना स्वातंत्र्य देण्याचे प्रयत्न करेल. - हेमंत मिना, उपवनसरंक्षक