शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरयातील उड्डाणपुलाचे रुंदीकरण केव्हा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

फोटो - बडनेरा १६ एस अपघात वाढले, वाहनचालक त्रस्त, भुयारी मार्गाची मागणी बड़नेरा : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे ...

फोटो - बडनेरा १६ एस

अपघात वाढले, वाहनचालक त्रस्त, भुयारी मार्गाची मागणी

बड़नेरा : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण केव्हा करणार, असा प्रश्न या मार्गावरील वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे व सततच्या अपघाताने समोर आला आहे. शासन, प्रशासनाने याची प्राधान्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे.

गांधी विद्यालयापुढील महामार्गावर तब्बल २५ वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आला. यादरम्यान लोकसंख्या व वाहने अनेकपटींनी वाढली. वाहनेदेखील प्रचंड वाढली. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन आहे. येथून रेल्वे गाड्या मिळविण्यासाठी प्रवाशांना हाच अरुंद उड्डाणपूल ओलांडून रेल्वे स्थानकावर यावे लागते. बडनेरा शहरातून नियमित अमरावतीकडे धावणाऱ्या वाहनांचीदेखील मोठी रेलचेल असते. याच उड्डाणपुलावरून एसटी बस, ऑटोरिक्षा, मिनीडोअर, सध्या बंद असलेल्या शहर बस यांचीदेखील वाहतूक असते. वाहनांच्या संख्येनुरूप हा उड्डाणपूल अरुंद झाला आहे. यामुळे बरेच अपघात होत असतात. रात्रीच्या वेळेत वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच पूल ओलांडावा लागतो. वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असणाऱ्या या पुलाचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

अंडरपासची मागणी

पाचबंगला परिसरातून शाळकरी विद्यार्थी, काटआमला मार्गाने शेतकरी यांना दररोज हा वर्दळीचा उड्डाणपूल ओलांडून अनुक्रमे गांधी विद्यालय व नवी-जुनी वस्ती गाठावी लागते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाणपुलालगत अंडरपास करावा, अशी मागणी नागरिक कृती समितीचे अरुण साकोरे, संजय यादव, अनिल बनसोड, अजय यादव, बंटी वाहने, संतोष भटकर, सुनील शेरेवार, रंजना साकोरे, प्रतिभा नकाते आदींनी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे केली आहे.

पुलाची धोकादायक अवस्था

उड्डाणपुलाच्या मध्यभागी व दोन्हीकडील उतारांवर खड्डे पडले आहेत. फूटपाथ धोक्याचे झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्यांची मोड़तोड झाली आहे. एकूणच या उड्डाणपुलाची अवस्था धोकादायक झाली आहे.