मोहन राऊत अमरावतीदारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना केवळ २५ रूपयांत एक महिना दीडशे किलोमीटरचा प्रवास करण्याची सोय इज्जत पासद्वारे शासनाने केली आहे. मात्र जिल्ह्यातील अशा कुटुंबांना या पासचा लाभ अद्यापही मिळाला नाही. जनजागृतीअभावी ही योजना बासनात गुंडाळल्याचे स्पष्ट दिसत आहे़जिल्ह्यात सर्वाधिक बीपीएलधारक रेल्वे मार्गावरील तालुक्यातील रहिवासी आहे़ याअंतर्गत बीपीएलधारकांना २५ रूपयांत एक महिना प्रवासाचा लाभ मिळू शकतो. परंतु प्रशासनाने मागील चार वर्षांत कोणतीही हालचाल केली नाही़ धामणगाव रेल्वे तालुक्यात ११ हजार ४४९ तर चांदूररेल्वे तालुक्यात ७ हजार १५७ तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ हजार ५४६ बीपीएलधारक आहेत़ धामणगाव, चांदूर येथून दीडशे किलोमीटर प्रवास म्हणजे शेगाव, विदर्भाची राजधानी असलेले नागपूर व अन्य ठिकाणी प्रवास करता येतो़ नांदगाव खंडेश्वर तसेच अमरावती शहरातील तब्बल १८ हजार ३९४ व अमरावती तालुक्यातील ११ हजार ७७० बीपीएलधारकांना व भातकुली तालुक्यातील ७ हजार २७४ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना बडनेरा रेल्वे स्थानक किंवा कोणत्याही रेल्वे स्थानकावरून दीडशे किलोमीटर अंतर एक महिन्यासाठी २५ रूपयांत प्रवास करता येतो़ दर्यापूर तालुक्यातील १४,६०३ व अंजनगाव तालुक्यातील १३,४९५ बीपीएलधारकांना अकोला, मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकावरून महागाईच्या ही योजना असताना बीपीएलधारकांना लाभ मिळाला नाही़ वरूड तालुक्यातील १४,७६३, अचलपूर- १६,०१६, तिवसा- ८,३२२ धारणी- ४,९९३ चिखलदरा- ३,६८१ या बीपीएलधारकांना जनजागृती अभावी ही इज्जत पास मिळाली नाही़ त्यामुळे ते सवलतीपासून वंचित आहेत.चार वर्षांत इज्जत पास रेल्वे प्रशासनच्या खिशात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सन २००९ मध्ये दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना रेल्वेने कमी दरात प्रवास करता यावा, या उद्देशाने इज्जत पास योजना सुरू केली होती. या योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील नागरीकांना २५ रूपये भरून पास काढलेल्या ठिकाणापासून क ोठेही १५० कि़मी़ प्रवास एक महिन्यासाठी मोफत करण्यात आला आहे़ परंतू रेल्वे च्या इज्जत पास योजने बाबत सर्व समाण्य रेल्वे प्रवाश्यांना अधीक ची माहिती मिळत नसल्याने आजही इज्जत पास बिपीएल धारकांऐवजी रेल्वे प्रशासनच्या खिश्यात आहे़ सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा रेल्वे मंत्रालयाकडून कमी उत्पन्न गटातील अर्थात दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कमी पैशात प्रवास करता यावा, यासाठी इज्जत पास योजना राबविली जात आहे़ मात्र या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबातील लाभ मिळण्याकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन या इज्जत पास योजनेबाबत जनजागृती आणि मेळावे घेणे आवश्यक आहे़
जिल्ह्यात कधी मिळणार इज्जत पासचा लाभ ?
By admin | Updated: September 26, 2015 00:04 IST