शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्ट्या केव्हा हटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:26 IST

कोंडेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या व जुना बायपास मार्गालगतच्या वीटभट्ट्या आरोग्यास हानीकारक ठरत आहे. अगदी मार्गालगतच्या वीटभट्ट्या हटविण्यात याव्या, अशी मागणी जोर धरत आहे. त्याची आस, प्रदूषण व धुळीमुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या गंभीर बाबीची मात्र महसूल विभाग दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : कोंडेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या व जुना बायपास मार्गालगतच्या वीटभट्ट्या आरोग्यास हानीकारक ठरत आहे. अगदी मार्गालगतच्या वीटभट्ट्या हटविण्यात याव्या, अशी मागणी जोर धरत आहे. त्याची आस, प्रदूषण व धुळीमुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या गंभीर बाबीची मात्र महसूल विभाग दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला आहे.श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थानची ओळख दूरपर्यंत आहे. नियमित व दर सोमवारी सुटीच्या दिवशी कोंडेश्वरला भाविकांची गर्दी असते. जुना बायपास मार्गालगत वीटभट्ट्या असल्याने या मार्गावरून एमआयडीसीकडे जाणारा मोठा कामगार वर्ग आहे. विद्यार्थीसुद्धा याच मार्गाने महाविद्यालयांमध्ये जात असतात. राखीची धूळ रस्त्यालगतच्या वीटभट्ट्याची आस व प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या सर्व बाबींमुळे खोकला, फुफ्फुसांचे आजार, धुळीची अ‍ॅलर्जी, त्वजेचा आजार बळावत आहे. या गंभीर बाबीची दखल घ्यावी, असे बोलले जात आहे. कोंडेश्वर देवस्थानकडे भाविक भक्तांना तोंडाला रूमाल बांधूनच जावे लागते. राखेच्या धुळीने भाविकभक्त सध्या त्रस्त आहेत. महसूल विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे. रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या तत्काळ हटवाव्यात, अन्यथा प्रशासकीय कारवाई करावी असे संतप्त नागरिकांमध्ये बोलले जात आहे. याबाबत तहसीलदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही. रॉयल्टी भरण्यापूर्वीच महसूल विभागाने याची दखल घ्यावी व रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.गौण खनिज चोरीला उधाणबडनेऱ्यात तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गौण खनिज चोरीस जात आहे. लाखो रूपयांचा चुना गौण खनिजचोरटे शासनाला लावित आहेत. मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानेच हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. गौण खनिज चोरट्यांवर आळा बसवावा, अशीही मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.