शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात ज्येष्ठांना लसीकरण ग्रामीणमध्ये केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने १ मार्चपासून ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. मात्र, ...

ठळक मुद्देसहा खासगी दवाखान्यांत २५० रुपयांत लसीची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने १ मार्चपासून ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. मात्र, तूर्त हे लसीकरण शहरी भागात असल्याने कोरोना लसीकरणाची माेहीम ग्रामीण भागात केव्हा राबविणार, असा सवाल ज्येष्ठांकडून उपस्थित होत आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी राबविण्यात आला. त्याअनुषंगाने लसीकरणाचे पहिले व दुसरे डाेस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच आता शहरी भागात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे निकष, अटी पूर्ण करणाऱ्या शहरी भागातील सहा खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सहा रुग्णालयांना लसीकरणासाठी दाेन हजार डोस उपलब्ध केले आहेत. लसीकरणासाठी वेबसाईटवर नोंदणी अनिवार्य आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग केवळ शहरी भागातच नसून, ग्रामीण भागातही असल्याने ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ज्येष्ठांची होत आहे. ३६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरणासाठी प्रस्तावजिल्ह्यातील ४९ पैकी ३६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ग्रामीण भागात लसीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन आरोग्य केंद्रांत लसीकरणाची सोय उपलब्ध होईल, अशी तयारी करण्यात येत आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. एका केंद्रात दोन हजार डाेजची व्यवस्था केली जात आहे. ग्रामीण भागासाठी किमान ७२ हजार लसी लागणार असून, एक लाख डोजची मागणी केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

येथे मिळते मोफत लसडॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका दवाखाना (भाजीबाजार), आयसोलेशन दवाखाना (दसरा मैदान), शहरी आरोग्य केंद्र (दस्तुरनगर), शहरी आरोग्य केंद्र (महेंद्र कॉलनी), महापालिका शाळा (नागपुरी गेट) व मोदी दवाखाना (नवीवस्ती, बडनेरा) 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस