शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

सरकीची दरवाढ, कापसाची केव्हा ?

By admin | Updated: March 12, 2017 00:33 IST

यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे.

शेतकऱ्यांना आशा : निर्यातीसह देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीअमरावती : यंदाच्या हंगामात तूर, सोयाबीन भाव कोसळले असताना कापूस मात्र हमीच्या वरच आहे. कापसाच्या गाठींची होत असलेली निर्यात, देशांतर्गत उद्योगात कापसाला असलेली मागणी व सरकीची होत असलेली भाववाढ यामुळे कापसाला किमान सहा हजारपर्यंत भाव मिळायला पाहिजे. मात्र त्या दराच्या आत कापसाचे भाव स्थिरावले असल्याने, कापसाला किमान सहा हजार भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. कित्येक हंगामाच्या तुलनेत यंदा प्रथमच कापसाच्या भावातील तेजीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सद्यस्थितीत कापसाच्या हंगामाला सुरूवात झाली. गतवर्षी दिवाळीला कापूस ५८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी कापसाचा भाव कमी होत आहे. मात्र तरीही हा भाव शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्तच आहे. मात्र, ज्या प्रमाणात सरकीचे भाव वाढत आहे, त्याप्रमाणात कापसाला भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. सद्यस्थितीत सरकीचे भाव २५०० ते २७०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. त्यामुळे कापसाला किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावयास पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन अधिक आहे व किमान ३ लाख क्विंटलपेक्षा अधिक गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत दीड लाख क्विंटल गाठींची खरेदी झालेली आहे. यंदा कापसाचे सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्र व गुजरातमध्ये होत आहे. या खालोखाल पंजाब, राजस्थान, हरियाणा, तेलंगना व आंध्रप्रदेशात देखील उत्पादन होत आहे. देशांतर्गत उद्योगात वाढती मागणीसह परदेशातदेखील कापसाची मागणी वाढली आहे. मागील वर्षी कापसाच्या गाठी शिल्लक होत्या मात्र, यंदा तशी स्थिती नाही. चीन, पाकिस्तान व बांगलादेशातदेखील कापसाची निर्यात सुरू झाली आहे व याचा परिणाम होऊन सरकीचे भाव वधारले आहे. मात्र, तुलनेत ५५०० ते ५८०० रुपये दरम्यान स्थिरावलेले कापसाचे भाव हे किमान सहा हजारापर्यंत पोहचतील असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. सोयाबीन, तुरीचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाचा आधार राहिला होता. व गतवर्षीपेक्षा यंदा भावदेखील समाधानकारक आहे. मात्र ज्याप्रमाणात सरकी व ढेपीची भाववाढ होत आहे. त्यातुलनेत कपाशीला भाव नाही.दीड दशकांपासून पणनची केंदे्र नावालाचलांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक असा ४०५० रुपये क्विंटल यंदाचा हमी भाव आहे. मागील वर्षी केवळ ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, खासगी बाजारात यापेक्षा अधिक भाव आहे. त्यामुळे शेतकरी पणनच्या खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत. किंबहुना दीड दशकापासून पणनच्या खरेदी केंद्रांची दैनावस्था आहे. जोवर हमीभावात वाढ होत नाही, तोवर अशीच स्थिती राहणार आहे. देशाच्या बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. गाठीची निर्यातदेखील सुरू झाली आहे. सरकीच्या भावातही तेजी आली आहे. यामुळे कापसाच्या भावात थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशात पाहिजे तशी मागणी नाही. - संजय राठी, कापूस व्यावसायी