शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीची मदत केव्हा ?

By admin | Updated: June 29, 2017 00:32 IST

मागिल खरीप हंगामात जून ते आॅक्टोबरमध्ये अतिवृष्टी व डिसेंबर ते जानेवारी दरम्यान अतिथंडीमुुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मागच्या खरिपातील नुकसान : ४१ हजार हेक्टर क्षेत्र होते बाधितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागिल खरीप हंगामात जून ते आॅक्टोबरमध्ये अतिवृष्टी व डिसेंबर ते जानेवारी दरम्यान अतिथंडीमुुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने महसूल यंत्रणेमार्फत सर्वेक्षण केले आणि निकषांनुसार मदतीचा निर्णय घेतला. आता यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीचा शासनालाच विसर पडल्याने पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत आले आहेत.मागिल वर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक ११५ टक्के पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, तूर, उडिदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान ३३ टक्क्यांवर असल्याने शासन मदत अपेक्षित होती. याबाधित क्षेत्रास मदत देण्याचा निर्णय शासनाने ९ जानेवारी २०१७ रोजी घेतला. नुकसानीचे पंचनामे शासनाकडे सादर झाले. अहवालानुसार जिल्ह्यात १९ हजार ५९० शेतकऱ्यांच्या १२ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन १,५४१ हेक्टर, कापूस ६६५ हेक्टर, तूर १,३४२ हेक्टर, मूग व उडिद ९.०४७ हेक्टर, फळपिके १४.९२ हेक्टर तसेच ४०.४४ हेक्टर भाजीपाला पिकांचे नुकसान होते. जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मागीलवर्षीचा पीकविमा जाहीर झाला व यंदाचा खरीप हंगाम देखील सुरू झाला. मात्र, शासनाने शेतकऱ्यांना मदत दिली नाही.मागील हंगामात ५२ दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे ६० दिवसांच्या अल्पावधीतील मूग, उडिदासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे तुरीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाधित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे आदेश दिलेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ही मदत देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. आता पुन्हा खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी अडचणीत आहेत. तुरीचे चुकारे नाहीत. थकबाकीदार असल्याने बँका कर्जासाठी माघारी पाठवित आहे. शासनाला मात्र यानिर्णयाचा विसर पडला आहे.फक्त दोन हेक्टर मर्यादेत मदतप्रचलित नियमानुसार शेती व फळपिकांच्या नुकसानीसाठी बाधित क्षेत्र ३३ टक्क्यांवर असल्यास दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेत मदत मिळू शकते. यासाठी तलाठी कृषी सहायक व ग्रामसेवकांचे संयुक्त अहवाल यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला सादर झालेले आहेत व त्यानुसारच ही मदत अपेक्षित आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार होती. मात्र, शेतकरी अडचणीत असतानासुद्धा दुर्दैवाने शासनाला या मदतीचा विसर पडला आहे.