शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एमआयडीसीत स्थानिक युवकांना प्राधान्य केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:54 IST

नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर सभागृहात कडाडल्या : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या भूलथापा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांना भूलथापा मिळत आहेत, असा घणाघाती हल्ला आ. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत सरकारवर केला.विधानसभेत आ. यशोमती ठाकूर यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. महिलांवरील अत्याचार, बलात्कार वाढले आहेत. राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची २९६२ प्रकरणे आहेत. गृह विभागाचाच हा चिंताजनक अहवाल असला तरी त्यावर प्रतिबंधक उपाययोजना झालेल्या नाहीत. अवैध गोरक्षण, गोमांस, गोवंशाचा अवैध व्यापार, गाईच्या नावावर जातीचे राजकरण याकडे सरकार डोळेझाक करीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील मिलिंद एकबोटे वगळता भिडे गुरुजी खुलेआम फिरत असून, त्यांना अटक झालेली नाही. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर परिसर व तिवसा बॉर्डरवरून वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री व तस्करी सुरू आहे. त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय पूर्णानगर व कौंडण्यपूर येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, कुºहा येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता तसेच तिवसा येथील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिटला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन रिक्त पदे मंजूर करण्याबाबत विनंती वजा पत्र त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दिले आहे.वलगाव सरपंच हत्याप्रकरणी आरोपींना अटक केव्हा?वलगावचे माजी सरपंच अब्दुल करीम (कम्मू भाई) यांच्या खुनाच्या आरोपींना अजून अटक झालेली नाही, नांदगाव खंडेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ता व शिक्षिका कविता इंगोले (कटकतलवारे) व नुकतेच शीतल पाटील यांच्या खुनातील आरोपी नाट्यमयरीत्या अटक होतात. सोशल मीडिया, सायबर क्राइम व फेसबूकवरील आक्षेपार्ह, अनैतिक पोस्ट, हॅकिंग याबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होत नसल्याबाबत आ.ठाकूर यांनी शासनाचे लक्ष्य वेधले