शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड ट्रकवर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:11 IST

तालुक्यातील सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड ट्रकमध्ये मुरूम, गिट्टी, तसेच पिवळी माती भरून सर्रास वाहतूक केली जात आहे.

ठळक मुद्देउदासिनता : महसूलसह, पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड ट्रकमध्ये मुरूम, गिट्टी, तसेच पिवळी माती भरून सर्रास वाहतूक केली जात आहे. एरवी ओव्हरलोडच्या नावाखाली इतर वाहनांवर कारवाही करणारे संबंधित अधिकारी याप्रकरणी गप्प का, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे विकासकाम सुरू आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. या महामार्गाच्या बांधकामात ई-क्लास जमिनीवरील पिवळ्या मातीचा उत्खनन करून वापर केला जात आहे. यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमबाह्य विनापरवाना गौण खनिजांची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे.या वाहनांमध्ये प्रत्येकी ५ ब्रास गौण खनिज वाहतुकीची परवानगी आहे. परंतु कंत्राटदार एका वाहनांमध्ये ६ ब्रासच्यावर गौण खनिजांची वाहतूक करीत आहे. अशा ओव्हरलोड वाहनाच्या दररोज शेकडो फेºया कंत्राटदाराकडून केल्या जात आहे. यामुळे गौण खनिजांचा शासनाला मिळणारा लाखोंचा महसूल बुडविला जात आहे. याचा फटका महसूल विभाग का सहन करत आहे, हे न सुटणारे कोडेच आहे. गौण खनिजांची वाहतूक करीत असताना मागून येणाºया वाहनाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे नियम आहे. त्यासाठी वाहनाला वरून प्लास्टिक कापडाने झाकणे अनिवार्य असताना नियमाची पायमल्ली संबंधित कंत्राटदाराकडून होत आहे. गौन खनिजातून महसूल प्राप्तीसाठी कारवाही करणारा महसूल विभाग तसेच ओव्हरलोडच्या नावाखाली उठसुठ कारवाई करणारा पोलीस विभाग या कंत्राटदारांच्या वाहनांवर कारवाही करण्याचे धाडस का दाखवित नाही, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.