शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'अ‍ॅक्शन प्लॅन'ची अंमलबजावणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:56 IST

शहरात धूलिकण, वायू व ध्वनीप्रदूषणावर उपाययोजनेसाठी महापालिकेने 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे.

ठळक मुद्देअमरावतीकर प्रतीक्षेत : धूलिकण, प्रदूषणाचा विळखा वाढतोय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात धूलिकण, वायू व ध्वनीप्रदूषणावर उपाययोजनेसाठी महापालिकेने 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केव्हा होणार, की ती केवळ कागदोपत्रीच राहणार, याबाबत अमरावकरांमध्ये शंका निर्माण होत आहे. उपाययोजनेसंदर्भात बैठक होऊन चार दिवस ओलांडून गेलेत, मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही कामाला हात लागला नाही.अमरावती महापालिकेकडून सन २०१६-१७ चा पर्यावरण स्थिती अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात हवेची गुणवत्ता दुय्यम होत असल्याचे आढळले असून हवेत धूलिकण (आरएसपीएम)चे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा अधिक वाढल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे ध्वनीप्रदूषण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. धूलिकण व प्रदूषणाच्या प्रकोपामुळे अमरावतीकरांचे आयुष्यमान घटत आहे. नागरिकांना आरोग्यविषय समस्या जाणवू लागल्या आहेत. श्वसनाचे आजार वाढले आहे. असे अनेक दुष्पपरिणाम होत असतानाही प्रशासनाने अद्यापपर्यंत ही बाब गांभीर्याने घेतली नाही. धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांवर घातक परिणाम करीत असल्याचे वृत्त मालिका 'लोकमत'ने लोकदरबारी मांडताच महापालिका प्रशासनाने दखल घेतली. उपाययोजनांसाठी संबधीत विभागांची बैठकी बोलावून अधिकाºयांनी मंथन व चर्चा केली. अ‍ॅक्शन प्लॅन तयार झाला. यासंबंधाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना सूचित करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही कामाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.अ‍ॅक्शन प्लॅनमधील उपाययोजनामहापालिकेतील बैठकीत दिलेल्या सूचनांमध्ये कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड डिमॉलिशन रुल्स २०१६ ची प्रभावी अमंलबजावणी सर्व विभागाने करणे आवश्यक आहे. विकासकामे सुरू असताना बांधकाम साहित्य हाताळणी, वाहून नेणे, चाळणे, यापासून धुलीकण उडू नये, यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचे फवारे मारणे, पडदी, बॅरीकेटींग आणि डस्ट सप्रेशन युनिटचा वापर करून धुळ उडणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले. कचरा (बायोमास) जाळण्यास बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रस्त्यांच्या रुदींकरणाची कारवाई करणे, रस्त्यावर खड्डे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, खडतर रोडवर कोटींग करून पून:बांधणी करण्याच्या सुचीत करण्यात आले आहे. मात्र, अद्यापर्यंत यापैकी एकाही उपाययोजनांची अ‍ॅक्शन घेतल्या गेली नसल्याचे आढळून येत आहे.स्वीपिंग मशीनचा वापर केव्हा ?शहारातील उड्डाणपूल व रस्त्यांच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात हवेत धूलीकण उडत असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. धूलिकणांवर उपाययोजनेसाठी स्वीपिंग मश्ीानद्वारे साफसफाई करण्याचे निर्देश महापालिकेतील बैठकीत देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत स्वीपिंग मशीनचा उपयोग करण्यात आलेला नाही.