शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शहर बसेसची चाके थांबली; चालक-वाहकांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: December 20, 2014 00:09 IST

बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी शहर बसच्या एका चालकाला नाहक मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही.

अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी शहर बसच्या एका चालकाला नाहक मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी चालक- वाहकांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. तब्बल चार तास शहर बसेसची चाके थांबली. आरोपींच्या अटकेसाठी कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून कैफियत मांडली.शहर बस चालक- वाहकांच्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपूर्वी शेख इमरान ऊर्फ सोनू या चालकाने मोटरसायकलला ‘कट’ मारल्याच्या कारणावरुन तीन ते चार जणांनी बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात मारहाण केली. कोणतीही पार्श्वभूमी नसताना क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी चालक शेख इमरान याने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मारहाण करणाऱ्या युवकांकडे असलेल्या पल्सर मोटसायकल गाडीचा क्रमांकही दिला. मात्र तीन दिवसांनंतरही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. याप्रकरणाची तक्रार महापालिका आयुक्त, उपायुक्तांना देण्यात आली आहे. परंतु प्रशासन स्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने शहर बसेसचे चालक- वाहकांनी शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारार काम बंद आंदोलन सुरु केले. परिणामी चार तासभर शहर बसेसची चाके थांबलीत. सुमारे ३३ शहर बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांना ये- जा करताना फारच त्रास सहन करावा लागला. दरम्यान महापालिका उपायुक्त विनायक औगड यांच्याशी शिवसेना कामगार नेते नितीन तारेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी चालक- वाहकांसह भेट घेतली. सतत चालक, वाहकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे प्रवाशांना सेवा देताना मनोबल खचत चालल्याची बाब प्रशांत वानखडे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मनपा उपायुक्त विनायक औगड यांनी बडनेऱ्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यजाचा प्रयत्न केला. पण, कडू यांनी उपायुक्तांना प्रतिसाद दिला नाही. ही बाब शहर बसेसचे चालक- वाहकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे ठाणेदार कडू यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठीचा मोर्चा पोलीस आयुक्तांच्या दिशेने वळविण्यात आला. यावेळी शेखर निर्वाण, अभि गौरकर, गजानन ढगे, अजय स्वामी, अजय डाखोरे, नरेंद्र इंगोले, रवी माहोरे, ज्ञानेश्वर लांडे, विपीन जवंजाळ, दत्ता शेवाणे, सचिन सियाले, ओेम मिश्रा, धनराज बनसोड, गजानन वाघमारे, नितीन भगत, नितीन यादव आदी उपस्थित होते.