शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिमीसाठी व्हील चेअरचे ‘जुगाड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:57 IST

मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे मागील पायाने अधू झालेल्या श्वानाला ‘वसा’ संस्थेने ‘जुगाड’ वापरून उभे केले. पुन्हा धावते केले. दोन महिन्यांच्या प्रेमळ सहवासानंतर या ‘जिमी’ने जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्दे‘वसा’चे श्वानप्रेम : दोन महिन्यांच्या शुश्रुषेनंतर अंत

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे मागील पायाने अधू झालेल्या श्वानाला ‘वसा’ संस्थेने ‘जुगाड’ वापरून उभे केले. पुन्हा धावते केले. दोन महिन्यांच्या प्रेमळ सहवासानंतर या ‘जिमी’ने जगाचा निरोप घेतला.भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी तत्पर वसाच्या रेस्क्यू हेल्पलाइनला अतुल पाटणकर यांनी २ मार्च रोजी मादी पिल्लाला अपघात झाल्याचे कळविले. शुभम सायंके, गणेश अकर्ते आणि निखिल फुटाणे यांनी पुंडलिकबाबा नगरातून छाया कावरे यांच्या मदतीने पिल्लाला घेऊन पशू सर्वचिकित्सालयात आणले. डॉ. अनिल कळमकर यांनी तपासणी केली. अपघातात एकाएकी अनावश्यक भर पाठीवर पडल्यामुळे या श्वानाच्या आतड्याचा शेवटचा भाग गुदद्वाराद्वारे बाहेर आला होता. मणक्याच्या दुखापतीमुळे मागील दोन्ही पायांना अपंगत्व आल्याने बाहेर आलेला आतड्याचे टोक जमिनीला घासून त्यातून सतत रक्तस्राव होत होता. पिल्लावर शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याने त्याला उत्तमसरा येथील वसाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.वसाची भूतदयाजिमीला लघवी आणि शौच स्वत:हून करता येत नव्हती. वसाचे शुभम सायंके गुदद्वारात बोट टाकून पिल्लाची विष्ठा बाहेर काढायचे. शौचाची जागा धुवून द्यायचे. या कामात त्यांचे बंधू भूषण सायंके व मुकेश मालवे मदत करायचे.जिमी झाली होती पायावर उभीजिमी तिच्या पायावर उभी राहू शकणार नाही, हे पक्के झाल्यावर शुभम सायंके यांनी व्हील चेअरची कल्पना विचारात घेतली. ३२० रुपयांत प्लास्टिक पाइपची व्हील चेअर वडिलांची मदत घेत त्यांनी तयार केली. पहिल्यांदा जिम्मी व्हील चेअरसकट जमिनीवर कोसळली. सरावानंतर ती हळूहळू चालू लागली आणि आठवड्याभरात व्हील चेअरसह सेंटरमध्ये बागळू लागली. रस्त्यावरून धावू लागली. विदर्भात अपंग श्वानासाठी ही कदाचित पहिली व्हील चेअर असेल.‘आॅनलाईन’ मदतकाही आठवड्यानंतर जिम्मीची पोस्ट वसाने फेसबूकवर टाकली असता, डोंबिवली, मुंबई येथील प्राणिप्रेमी प्रतिमा दातार यांनी जिम्मीच्या पाठीच्या मसाजसाठी आयुर्वेदिक तेल पाठविले. अमरावती येथील भूषण वानखडे आणि रूपाली वानखडे यांनी जिम्मीच्या जेवणाची जबाबदारी घेतली.