शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सागवान वृक्षांमध्ये गव्हाची पेरणी; सिपना वन्यजीव विभागातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:25 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह क्षेत्रात २५ ते ३० लोकांनी जंगल क्षेत्रात खुलेआम अतिक्रमण केले आहे.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह क्षेत्रात २५ ते ३० लोकांनी जंगल क्षेत्रात खुलेआम अतिक्रमण केले आहे. १२० ते १३५ हून अधिक गोलाईच्या शेकडो सागवान वृक्षांच्या मध्ये या अतिक्रमितांनी वनजमीन साफ करून शेतीयोग्य केली आहे. यात काहींनी अधिका-यांच्या डोळ्यांदेखत गव्हाची पेरणी केली आहे. अगदी राज्य महामार्गाला लागून हे अतिक्रमण आहे.व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलासमोर राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाला लागून असलेल्या जमिनीवरही हे अतिक्रमण आहे. १० ते १५ वर्षांपासून तेथे जंगल उभे आहे. २० ते ३० वर्षांहून अधिक वयाचे शेकडो सागवान वृक्ष त्या ठिकाणी उभे आहेत. अगदी महिना-दीड महिन्यात हे अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमणकर्त्यांजवळ जुन्या वन गुन्ह्याचे, अतिक्रमणाचे गुन्हा दाखल असल्याबाबतची कागदपत्रे आहेत. यापूर्वी त्यांनी या वनजमिनी कसल्या आहेत. मात्र, मागील १० ते १५ वर्षांत त्यांनी या जमिनी कसलेल्या नाहीत. या जमिनी मिळाव्यात म्हणून त्यांचे न्यायालयात प्रकरण सुरू आहे. आम्ही या जमिनी कसणारच असे स्पष्ट करीत व्याघ्र प्रकल्प अधिका-यांना त्यांनी सुनावले आहे. या अतिक्रमणाच्या अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक माधवराज, सहायक वनसंरक्षक तोरो यांनी घटनास्थळाला पाच दिवसांपूर्वीच भेटी दिल्या आहेत. जवळपास २५ ते ३० लोकांवर नव्याने वनगुन्हे दाखल केले आहेत. तरी त्यांचे अतिक्रमण सुरूच आहे.अतिक्रमण क्षेत्रातील झाडांची मोजणी करून त्या झाडांवर नंबर टाकले जात आहेत. क्षेत्राची मोजणीही केली जात आहे. या अतिक्रमितांपुढे सिपना वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी हतबल असल्याचे दिसून येत आहे. वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या निवासस्थानापुढेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सेमाडोह क्षेत्रातील अतिक्रमण बघता अतिक्रमितांनी व्याघ्र प्रकल्पाला खुले आव्हानच दिले आहे. आठ दिवसांपूर्वी सेमाडोह येथील कार्यशाळेच्या निमित्ताने आलेल्या वरिष्ठ वनाधिका-यांनीही हे अतिक्रमण बघितले आहे. या नव्याने झालेल्या अतिक्रमणाची मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सर्वदूर चर्चा आहे. यासंदर्भात वनविभागाशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती