शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार  १२३ बस  विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त  बस बंद आहेत  आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महामंडळाचे शासनात विलिनीकरण होऊ नसल्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे.  विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे.  त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे  पुढे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  दुसरीकडे अद्यापही अनेक गावात बसेस सुरू नाही. त्यामुळे गावात बस कधी येणार, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही हा संप मिटलेला नाही. परिवहन मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार  १२३ बस  विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त  बस बंद आहेत  आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महामंडळाचे शासनात विलिनीकरण होऊ नसल्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ग्रामीण भागातील एसटी बंदच-    मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

आंदोलक कर्मचारी काय म्हणतात? 

चार महिन्यांपासून आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला वाटले होते की, विलीनीकरण होईल, परंतु तसे झाले नाही. ५ एप्रिल रोजी यावर न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल.- संजय मालवीय, संपकरी एसटी

आम्ही विलीनीकरणासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. शासनाने आमचा विचार करून विलीनीकरण द्यावे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. - सतीश कडू, संपकरी एसटी

एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे. विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर झाले पाहिजे.- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

४५० जण बडतर्फ

वारंवार आवाहन करूनही कामावर हजर न झालेल्या ४५० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी अपील करून कामावर हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही बडतर्फ कर्मचारी अपील करुन कामावर परतत आहेत. असे असले तरी त्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप