शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुठलाही ताप असो, रुग्णाची आरटीपीसीआर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST

अमरावती : रुग्णाला टायफाईड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास त्यावरील उपचार करतानाच रुग्णाची दोन दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. ...

अमरावती : रुग्णाला टायफाईड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास त्यावरील उपचार करतानाच रुग्णाची दोन दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. जेणेकरून तो कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यास त्याला वेळीच उपचार मिळू शकेल. अनेकदा उशिरा निदान झाल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे कुठल्याही तापाचे निदान करताना रुग्णांची कोरोना चाचणी करूनच घ्यावी. ग्रामीण भागातील डॉक्टर मंडळींनी ही बाब कसोशीने पाळावी, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या डॉक्टरांच्या बैठकीत मांडण्यात आली.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणा, इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध मान्यवर डॉक्टर मंडळींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनेकदा रुग्णाला ताप आल्यानंतर टायफाईड किंवा इतर प्रकार तापाचे निदान होते. तेवढ्यापुरतेच उपचार केले जातात. मात्र, अशावेळी रुग्ण कोरोनाबाधित असल्यास त्याचा आजार वाढू शकतो. त्यामुळे कुठलीच जोखीम न घेता ताप आला तरी चाचणी करूनच घ्यावी. सध्याचे संक्रमण पाहता प्रत्येक ताप हा कोरोना समजावा, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे डॉक्टरांनी, विशेषत: ग्रामीण भागातील डॉक्टरांनी ही बाब कसोशीने पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य शासनाच्या टास्क फोर्सने याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहे.

बॉक्स

डॉक्टरांनी ताप म्हणजे कोरोना समजावा

यापूर्वी ही साथ शहरी भागात अधिक होती, ती आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टर बांधवांनी प्रत्येक ताप म्हणजे कोरोना समजावा. सर्वप्रथम त्याला आयसोलेशनचा सल्ला द्यावा व त्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणीही करून घ्यावी. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरला रुग्णावरील उपचारात ॲजिथ्रोमायसीन, आयवरमॅक्टिन, माँटेल्युकास्ट अशी औषधे वापरता येतील, अशी सूचना डॉ. प्रफुल्ल कडू यांनी केली.

बॉक्स

घरगुती उपचारांवर विसंबून राहणे धोक्याचे

नागरिकांनी हलका ताप असला तरी डॉक्टरांकडून तपासणे व चाचणी करून घेणे आवश्यक आहे. घरगुती उपचारांवर विसंबून राहू नये. या काळात वैद्यकीय तपासणी व योग्य उपचारच घ्यावेत, अशी सूचना डॉ. अनिल रोहणकर यांनी केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर अख्खे कुटुंबच पॉझिटिव्ह येत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांची चाचणी होणे आवश्यक आहे.