शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

एसटी महामंडळाच्या संपकऱ्यांचे आता पुढे काय होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

गत  ऑक्टोबर २०२१ पासून अमरावती विभागातील दोन हजार ४०० कर्मचारी संपावर होते. जवळपास साडेपाच महिने संपत चालला. या दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर अजूनही ११५०  कर्मचारी संपात सहभागी आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. या भूमिकेवर कर्मचारी ठाम होते. शासनाने या काळात कर्मचाऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेतले. मात्र, विलीनीकरणाशिवाय कामावर येणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहन विभागातील ११५० कर्मचारी संपावर होते. गुरुवारी   मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला निवृत्ती योजना प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युईटी सातवा वेतन आयोगासंदर्भात निर्देश देऊन कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये, असे सूचित केले आहे. २२ एप्रिलपर्यंत कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असेही आदेशित केले आहे. आता कामगार येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.गत  ऑक्टोबर २०२१ पासून अमरावती विभागातील दोन हजार ४०० कर्मचारी संपावर होते. जवळपास साडेपाच महिने संपत चालला. या दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर अजूनही ११५०  कर्मचारी संपात सहभागी आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. या भूमिकेवर कर्मचारी ठाम होते. शासनाने या काळात कर्मचाऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेतले. मात्र, विलीनीकरणाशिवाय कामावर येणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.

११५० कर्मचारी अद्यापही संपात- विभागातील २४०० पैकी ११५० कर्मचारी अद्याप संपावर आहेत. गुरुवारी मुंबई हायकोर्टाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे सूचित केले आहे. यावर कर्मचारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

५० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस अजूनही बंद- एस.टी.  कर्मचारी संपात सहभागी झाल्यानंतर जवळपास सर्व बसेस बंद झाल्या. मधल्या काळात काही बसेस सुरू झाल्या. - अशातच संपातील  काही चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत. त्याच्या माध्यमातून ५० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस बंद आहेत. सध्या १५०  बसेस दररोज धावत आहेत.

निलंबित तरीही परिणाम नाहीसंपकरी कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आदेशान्वये मधल्या काळात कारवाई करण्यात आली होती. काहींना बडतर्फ करण्यात आले. काहींना तातडीने निलंबित केले, तर काहींच्या सेवा समाप्त करण्यात आल्यात. मात्र प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईचा कर्मचाऱ्यांवर काहीही परिणाम झाला नाही. 

संपकरी आता काय म्हणतात?

हायकोर्टाने एसटी कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र, लेखी स्वरूपात आम्हाला याबाबत माहिती मिळाल्यावर तसेच आमचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ. तूर्तास आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.- संजय मालवीय, संपकरी

आझाद मैदान मुंबई येथे आमचे सहकारी कर्मचारी आंदोलन करीत आहे. आतापर्यंत आमचे १२४ सहकारी बंधू मरण पावले. याबद्दल शासन काही करणार आहे की नाही? आमच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी याबाबत लेखी पत्र मिळाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ.- सतीश कडू, कर्मचारी

गुरुवारच्या आदेशाप्रमाणे संपकरी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहावे. लग्नसराईच्या काळात प्रवाशाची गैरसोय होणार नाही, याकडे सहानुभूतीने कर्मचाऱ्यांनी प्रवासी, विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप