शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘लगेज स्कॅनर’चा उपयोग काय ?

By admin | Updated: June 23, 2015 00:55 IST

रेल्वे स्थानकावर ‘लगेज स्कॅनर’ मशीन अधूनमधून बंद ठेवली जाते.

बडनेरा : रेल्वे स्थानकावर ‘लगेज स्कॅनर’ मशीन अधूनमधून बंद ठेवली जाते. याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारीदेखील तैनात नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रेल्वेस्थानकाच्या नवी वस्ती परिसरातील तिकीट घराजवळ लगेज स्कॅनर मशीन बसविण्यात आली आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही स्कॅनर मशीन याठिकाणी लावण्यात आली असले तरी बहुतेक वेळा ती बंदच राहत असल्याने त्या मशीनचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा बलाचा एक पोलीस येथे तैनात करण्यात आला आहे. मात्र, ते याठिकाणी कधीही हजर नसतात. त्यामुळे प्रवासी बिनदिक्कतपणे विनातपासणी रेल्वे स्थानकात शिरतात आणि जातातही. प्रवाशांजवळील लगेज स्कॅन करण्यासाठी हे यंत्र लावण्यात आले आहे. जेणेकरून घातपाताच्या वस्तू रेल्वे स्थानकावर येऊ नयेत किंवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर जाऊ नयेत, असा यामागील उद्देश आहे. मात्र, हे मशीन बरेचदा बंद असते. याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने प्रवासी या मशिनचा उपयोग बसण्यासाठी करीत आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाची सुरक्षा यामुळे ऐरणीवर आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या हलगर्जीपणामुळे एखादवेळी मोठा अपघातदेखील घडू शकतो. बडनेरा जंक्शन असल्याने येथून दरदिवसाला मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे लगेच स्कॅनिंग यंत्र कार्यान्वित असणे आवश्यक आहे. त्यातून रेल्वेस्थानकाला असलेला संभाव्य धोका आधीच कळू शकतो. त्यामुळे तो टाळताही येऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे जाणकारांचे मत आहे. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे काय ?बडनेरा हे जंक्शन असल्याने देशभरातून प्रवासी येथे उतरतात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जातातही. सुरक्षेची कोणतीही तरतूद नसल्याने या स्थानकावरून बिनबोभाट घातक, तस्करीच्या वस्तुंची ने-आण करता येते. यातून मोठी घटनादेखील घडू शकते.