शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आकाशवाणी कार्यक्रमांचा उद्देश काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:24 IST

येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देप्रतिभावंत, कर्मयोगी दुर्लक्षित : अधिकारी, कर्मचाºयांचे वास्तव्य परगावी, स्थानिक गुणवत्ता हेरण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे.शिक्षण, माहिती-प्रसारण, प्रबोधन, प्रेरणाकार्य, कला-लोककला, भाषा आदींबाबतचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आकाशवाणी कार्यरत आहे. स्थानिक केंद्रांमधून अशा स्थानिकांना स्थान मिळणे अपेक्षित आहे. परंतु, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे अनेक व्यक्तिमत्त्व आकाशवाणीने दुर्लक्षित केले आहेत.प्रसारणाची संधी मिळण्यासाठी कुठलीही निश्चित शिस्त आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रात नाही. संबंधितांशी स्वत: संपर्क करुन बायोडेटा मागवून प्रसारणाची संधी दिली जाते, अशी माहिती कार्यक्रम प्रमुख सुनालिनी शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही पद्धती आक्षेपार्ह नसली तरी अनेक प्रतिभावंत आणि कर्मयोगी शर्मा यांच्या यादीत समाविष्ट नसल्यामुळे त्यांच्यात नाखुषीचा सूर आहे.केंद्र सरकारच्या नभोवाणी मंत्रालयाने आकाशवाणी केंद्राच्या परिसरात अधिकारी, कर्मचाºयांसाठीे स्वतंत्र वसाहत साकारली आहे. नियमानुसार याच वसाहतीत वास्तव्य असावे, असे अपेक्षित आहे. परंतु, काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा करीत असल्याने कार्यक्रमांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होतो. स्थानिक पातळीवर दोन तास कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहेत. त्यातही मराठी भाषेशी दुजाभाव केला जातो, अशी खंत जिल्हाभरातील अनेक मराठीप्रेमींनी व्यक्त केली.खरे हिरे दुर्लक्षित?अमरावतीच्या महेंद्र भुतडा आणि अजय दातेराव या समाजकार्याला वाहिलेल्या मित्रांनी रक्तदान चळवळीत देशभरात नवा विक्रम केला. १९७६ पासून रक्तदान करणे आणि त्यासाठी प्रेरित करणे हेच ध्येय बाळगलेल्या या दोघांनी ४५०० रक्तदान शिबिरे आयोजित करून साडेतीन लक्ष युनिट (बॉटल) रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले. हजारोंचे प्राण त्यामुळे वाचू शकले. नि:शुल्क सेवा देणाºया या देवदूतांची दखल राष्ट्रपतींनी घेतली. मात्र, अमरावती आकाशवाणीने त्यांना दुर्लक्षित केले. उदाहरणादाखल भुतडा आणि दातेराव यांचा उल्लेख येथे केला असला तरी अशा अनेक हिºयांची चमक आकाशवाणीला का दिसू नये?आकाशवाणी प्रसारण केंद्रातून स्थानिक २०० जणांना संधी दिली. त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. एकाच व्यक्तीला वारंवार बोलावून प्रसार, प्रचार केला जात नाही.- सुनालिनी शर्माकार्यक्रम प्रमुख,आकाशवाणी, अमरावती.