शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आज संपणार मुदत, ३७ हजार टोकनचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:55 IST

जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद्रांवर मंगळवार १५ मे पासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. १८ एप्रिलनंतर मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ खरेदीदार यंत्रणांनी उठविलाच नाही.

ठळक मुद्देखरेदीची मंदगतीच कारणीभूत : शेतकऱ्यांच्या घरी तीन लाख क्विंटल तूर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद्रांवर मंगळवार १५ मे पासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. १८ एप्रिलनंतर मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ खरेदीदार यंत्रणांनी उठविलाच नाही. याऊलट बारदाना, गोदाम नाही आदी सबबीखाली मोजणीची मंदगती कायम ठेवल्यानेच जिल्ह्यातील ३७ हजार टोकनधारक शेतकरी प्रतीक्षेत राहिले आहेत. आता शेतकरी खरीपपूर्व मशागत व लगेच पेरणीच्या कामात व्यस्त होणार असल्यानेच शासनाने वेळकाढू धोरणाचा अबलंब केल्याचा आरोप होत आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ तूर खरेदी केंद्रांवर बुधवार १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाईन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश आहेत. त्यानंतर आठ दिवसांनी केंद्रांना १५ मुदतवाढ दिली असली तरी खरेदीदार यंत्रणांनी निव्वळ टाईमपास केला. त्यामुळेच आजतारखेला ३७ हजार ४४२ टोकनधारक शेतकºयांची किमान तीन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १३ मेपर्यंत ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असली तरी किमान तीन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. तूर खरेदीला १५ मे ची 'डेडलाइन' देण्यात आली. जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ७०,१९७ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात ३२,७५५ शेतकºयांची ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे.यंदाच्या हंगामात साधारणपणे एक लाख १० हजार क्विंटल तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १५ क्विंटल जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यात यंदा १५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकºयांच्या घरी किमान तीन लाख क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.अशी आहेकेंद्रनिहाय नोंदणीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ८,८६३, अमरावती- ८,६१३, अंजनगाव सुर्जी- १,२९९, चांदूरबाजार- २,००७, चांदूर रेल्वे ४,७४३, दर्यापूर- ७,२२६, धारणी- ९३५, नांदगाव खंडेश्वर- ४,७३४, तिवसा- २,७८६, मोर्शी- ७,४१५, धामणगाव रेल्वे- ६,४६४ व वरूड तालुक्यात ७,५०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.अशी आहेकेंद्रनिहाय खरेदीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ४८,४४७, अमरावती- ६९,६९३, अंजनगाव सुर्जी- ३४,४५२, चांदूरबाजार- ४०,४१५, चांदूररेल्वे- ४०,५२८, दर्यापूर- ७८,०७८, धारणी- ८,१५८, नांदगाव खंडेश्वर- २५,००२, तिवसा- २९,५२१, धामणगाव- ३४६६३, मोर्शी- ६५ हजार ८८ व वरुड तालुक्यात ४७,६४१ क्विंटल खरेदी केली आहे.