शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलसाठी कारवाई इअरफोनबाबत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:00 IST

वाहन चालविताना एखादा चालक एकटाच बडबड करताना दिसतो. त्याचे जवळून निरीक्षण केल्यास, त्याच्या कानात इअरफोन असल्याचे दिसते. हा प्रकार नियमबाह्य आहे, मात्र, मोबाइल हाती घेऊन कानाला लावून बोलणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. इअरफोनवर बोलणाºयांविरुद्ध कधीच कारवाई का होत नाही, असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे.

ठळक मुद्देपोलीस संभ्रमात : ‘हे’देखील वाहनचालकांच्या जीवावर बेतणारे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाहन चालविताना एखादा चालक एकटाच बडबड करताना दिसतो. त्याचे जवळून निरीक्षण केल्यास, त्याच्या कानात इअरफोन असल्याचे दिसते. हा प्रकार नियमबाह्य आहे, मात्र, मोबाइल हाती घेऊन कानाला लावून बोलणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. इअरफोनवर बोलणाऱ्यांविरुद्ध कधीच कारवाई का होत नाही, असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे.इअरफोनवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीससुद्धा संभ्रमात पडल्याची स्थिती आहे. शहरातील वाहतुकीची अस्ताव्यस्त स्थिती पाहता, वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागते. अशा स्थितीतसुद्धा काही चालक मोबाइलवर बोलत वाहन चालवितात. हा गंभीर प्रकार जिवावर बेतू शकतो. मात्र, याकडे वाहनचालक दुर्लक्ष करतात. वाहन चालविताना चालक मोबाइलवर बोलत असल्याचे वाहतूक पोलिसांना दिसून पडले. मात्र, इअरफोनवर बोलणारे सहजासहजी दिसून पडत नाही. त्यामुळे अशा वाहनचालकांना कसे पकडावे, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. शहरातील विविध मार्गांवर काही तरुण-तरुणी इअरफोन कानात टाकून गप्पा मारत दुचाकी चालवितात. इअरफोन फोनवर बोलत-बोलत बेभान होऊन वाहन चालवितात. त्यांना बाहेरील वाहतुकीशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येते. बेभान अवस्थेत दुचाकी चालवित असताना, अन्य वाहनचालकांचा जीव टांगणीला लागतो; मात्र त्या वाहनधारकांना काहीच फरक पडत नाही.इअरफोन कानात असताना बाहेरील वाहनांचे आवाज सहजासहजी ऐकायला येत नाही आणि अशावेळी वळण घेतानासुद्धा इअरफोनवर संवाद निरंतर सुरूच ठेवतात. हा गंभीर प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा ठरतो. मोबाईलवर बोलत असताना वाहनचालकांचे अपघात शहरात घडले आहेत. त्यामुळे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस गांभीर्य दाखवितात. मात्र, इअरफोनवर बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष का केले जाते, हा प्रश्न अनुत्तरित आहे.५० जणांवर कारवाईवाहतूक शाखेचे पोलीस मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवूनच असतात. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी तब्बल ७० जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. काही जण तर पोलिसांना पाहून पळून गेले. मात्र, त्यांच्या दुचाकी क्रमांक नोंदवून घरपोच मेमोसुद्धा देण्यात आले आहे.फोनवर बोलणाऱ्यांचे अन्य वाहतुकीवर दुर्लक्ष होते; ते नियमबाह्यच आहे. मात्र, इअरफोनवर बोलत वाहन चालवित असल्याचे त्यांना पकडल्यावर प्रूव्ह करणे कठीण आहे. याशिवाय आम्ही इअरफोनवर बोलत नसल्याचे सांगून अनेक वाहनचालक वादसुद्धा घालतात.- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.