श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : जुनाबायपास मार्गावर एका लॉनलगत कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असणारे अन्न परिसरात दुर्गंधी पसरवित आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्तांनीच याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.जुना बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉटेल, ढाबे, लॉन्स, मंगल कार्यालये आहेत. या मार्गावरील एका लॉनलगत अन्न उघड्यावर टाकण्यात आले आहे. कित्येक दिवसांपासून असणारे अन्नाचे वेस्ट दुर्गंधी पसरवित आहे. या दुर्गंधीपासून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पुढे पावसाळ्याचे दिवस आहे. अन्नाचा सडवा असाच पडून राहिल्यास येथून नागरिकांना ये-जा करणे कठीण होईल, अशी स्थिती आहे. हॉटेल, ढाबे, लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये अन्नाचे वेस्ट दररोज नेण्याचा स्वतंत्र कंत्राट मनपाचा आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे त्रस्त नागरिकांमध्ये बोलले जात आहे. अन्यथा यापासून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कोंडेश्वरला जाणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा त्रासकोंडेश्वर मार्गावरील वृद्धाश्रमालगतच्या शासकीय खुल्या जागेत नजीकचे हॉटेलचालक वेस्ट मटेरीयल व उरलेला अन्नाचा सडवा टाकत आहेत. त्याचा मोठा मनस्ताप भाविकभक्तांसह इतर जाणाºया व येणाऱ्यांना होत असल्याने बंद करण्याची मागणी आहे.ढाबे, हॉटेलचालकांना नियमांचा विसर, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षबडनेरा ते अमरावती मार्गावर थोड्या-थोड्या अंतरावर हॉटेल्स, ढाबे आहेत. उशिरा रात्रीपर्यंत ते सुरू असतात. त्यांना पोलिसांचे भयच नसल्याचे चित्र आहे. नियमांची पूर्णपणे पायमल्ली होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकाही मार्गावर एवढे हॉटेल व ढाबे नसतील तेवढे या मार्गावर आहेत. हा मार्ग धोक्याचा ठरत आहे.
हॉटेल, लॉन्सचे वेस्ट टाकतात उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:33 IST
जुनाबायपास मार्गावर एका लॉनलगत कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असणारे अन्न परिसरात दुर्गंधी पसरवित आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्तांनीच याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
हॉटेल, लॉन्सचे वेस्ट टाकतात उघड्यावर
ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : जुन्या बायपासवर सर्रास प्रकार, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात