शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

शोधायला गेले दारू; सापडले १२ लाख

By admin | Updated: June 23, 2017 00:09 IST

अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता एका घराची झडती घेतली.

आरोपीस अटक : परतवाड्याच्या बुनकरपुऱ्यातील घटनालोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता एका घराची झडती घेतली. दारू तर मिळालीच सोबत एका कपाटात आल्या त्या तब्बल १२ लाख ३८ हजार रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या करकरीत नोटांचे बंडल.दीपक गोपाळराव लोंदे (४०, रा. बुनकरपुरा, परतवाडा) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुरूवारी त्याला अचलपूर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.दीपक गोपाळराव लोंदे हा अवैधरीत्या दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता बुनकरपुरा येथे जाऊन घराची झडती घेतली. त्यामध्ये पाच बॉटल विदेशी दारू व गावठी दारू असा जवळपास दोन हजार दोनशे रुपयांचा अवैध माल आढळून आला. पोलिसांनी दारू जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.कपाट उघडताच, नोटांचे बंडलपोलिसांनी अवैधरीत्या दारुसाठा कुठे लपवून ठेवला यासाठी घराची झडती घ्यायला सुरूवात केली. कपाटामध्ये काही लपवून ठेवले का यासाठी ते उघडायला लावले. मात्र कपाटात दारू नव्हती. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटांचे कोरे करकरीत बंडल आढळून आले. हे पाहून पोलीसही अवाक् झाले. त्यांनी दीपक लोंदे याला नोटांबद्दल विचारणा केली असता तो योग्य उत्तर देऊ शकला नाही. एकूण १२ लाख ३८ हजारांची माहिती आयकर विभागाला दिली आहे.शहरातील बुनकरपुरा येथील दीपक लोंदे यांच्या घरी बुधवारी अवैध दारू विक्रीतून झडती घेतली असता दारूसह १२ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. आयकर विभागाला त्याची माहिती देण्यात आली आहे.- संजय सोळंके,ठाणेदार, परतवाडा