शाळा प्रवेशारंभ : विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरणधामणगाव रेल्वे : जि.प. शाळा विरूळ रोंघे येथे २७ जून रोजी शाळा शुभारंभदिनी वीरेंद्र जगताप यांनी भेट दिली. इयत्ता पहिलीत दाखल नवोगत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक मंडळ, पालक, शिक्षकांशी संवाद साधून शाळेच्या प्रगतीबाबत चर्चा केली. शाळेतील लोकसहभागातून उपलब्ध ई-लर्गिंग क्लासरुमची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुनंदा बंड, केंद्रप्रमुख संजय जारी, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे, सरपंच गीता बुगल, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कल्पना रोंघे, पोलीस पाटील, प्रमोद रोघें, उपाध्यक्ष सुवर्णा वाघ, उपसरपंच शेंदरे, अतुल वाघ, गोपाल मांडूळकार, राजश्री रोघे, यादवराव मेश्राम, माजी सरपंच रुपेश गुल्हाने, राजीव रोघें, माधुरी रोंघे, विलास गुल्हाने तसेच पालकवर्ग, अंगणवाडी सेविका, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक गणेश वासनकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता सहायक शिक्षक अमोल पोकळे, संगीता आंबटकर, ममता जाधव यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)
आमदारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
By admin | Updated: June 28, 2016 00:05 IST