अमरावती : पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होणाऱ्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीला ४२१ वर्षे पुरातन परंपरा असून कौंडण्यपूर येथून निघणाऱ्या या पालखीचे अमरावती शहरात २६ जून रोजी ठिकठिकाणी जंगी स्वागत केले जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. कौंडण्यपूर तिर्थक्षेत्र प्रभू रामचंद्राची आजी, राजा दशरथची आई इंदुमती, नल राजाची राणी दमयंती, भगीरथ राजाची माता केशनी आणि अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा ही पुराण प्रसिध्द नावे कौंडण्यपूरचे महात्म्य सांगणारी आहे. या सर्व बाबींचा वारसा जपून माता रुख्मिणीच्या पालखीचे महत्व जपण्याच्या उद्देशाने सदर पालखीचे स्वागत होणे गरजेचे आहे.जून २०१४ मध्ये माता रुख्मिणीच्या पालखीला मानाची पालखी असा मान पंढरपूरला आमदार यशोमती ठाकूर यांनी पुजन करुन पंढरपूर संस्थानात सदर पालखीची नोंद करुन पंढरपूर येथे दरवर्षी या पालखीला आता मानाची पालखी म्हणून स्वागत होणार आहे. आ. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर २२ कोटींच्या कौंडण्यपूर आराख्याच्या विकास कामासह धार्मिक, सांस्कृतिक व पौरानीक महत्व जपून आ. ठाकूर यांच्या हस्ते बियाणी चौक येथे २६ जून रोजी दुपारी ५ वाजता सदर पालखीचे व वारकरी मंडळींचे स्वागत विविध अधिकारी मंडळी, जेष्ठ नागरिक, भाविक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे. सदर पालखी समवेत माता अंबा व एकविरा देवीचे दर्शन सुध्दा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
कौंडण्यपूरच्या पालखीचे अमरावतीत होणार स्वागत
By admin | Updated: June 26, 2015 00:29 IST