शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेलकम अर्थमंत्री साहेब, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:33 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील फासेपारधी, अनाथ व निराधार विद्यार्थ्यांनी सोमवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या मांडली. ‘वेलकम अर्थमंत्री साहेब, पाण्याचा प्रश्न सोडवा’ असे दोन्ही हात उंचावून त्यांच्या पुढ्यात ही महत्त्वाची मागणी मांडली.

ठळक मुद्देफासेपारधी मुलांची मागणी : महसूलच्या जागेवरील हातपंप नियमित करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील फासेपारधी, अनाथ व निराधार विद्यार्थ्यांनी सोमवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या मांडली. ‘वेलकम अर्थमंत्री साहेब, पाण्याचा प्रश्न सोडवा’ असे दोन्ही हात उंचावून त्यांच्या पुढ्यात ही महत्त्वाची मागणी मांडली.विभागीय आयुक्त कार्यालयात ना. मुनगंटीवार हे नियोजन बैठकीसाठी आले असता, त्यांना प्रश्नचिन्ह शाळेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी आश्रमशाळेतील पाणीप्रश्नाबाबत अवगत केले. ना. मुनगंटीवार येताच विद्यार्थ्यांनी हात उंचावून टाळ्या वाजविल्या.आश्रमशाळेत लोकवर्गणीतून हातपंप केला. मात्र, तो कोरडा गेल्याने नजीकच्या कनी मिर्झापूर येथील महसूलच्या जागेवर हातपंपातून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. १८० फूट बोअर केले असून, एक इंच पाणी लागले. आश्रमशाळेची मागणी अधिक असल्याने हातपंपाचे पुन्हा खोलीकरण आवश्यक आहे. परंतु, तेथील संरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मनाई केली आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने हातपंप खोलीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी भोसले यांनी केली. निवेदनाच्या अनुषंगाने ना. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.आश्रमशाळेच्या आवारात पाण्यासाठी ८ ते १० वेळा बोअर करण्यात आले. मात्र, पाणी कुठेच लागले नाही. त्यामुळे लोकवर्गणीतून हातपंप घेतला. पाण्याची समस्या वाढीस लागत असल्याने कनी मिर्झापूर येथील हातपंपाचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. शाळेत ४२१ विद्यार्थी आहेत.- मतीन भोसले, अध्यक्ष, प्रश्न चिन्ह आश्रमशाळा