शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या जन्माचे स्वागत आता रोपट्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:12 IST

शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देनगरविकास विभागाचा पुढाकार : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे. याकरिता नगरविकास विभागाने पुढाकार घेतला असून, ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ या अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.राष्ट्रीय वननीती, १९८८ मधील धोरणानुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादान, वनीकरण असणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात हे प्रमाण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सर्वसाधारणपणे २० टक्के आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतूमध्ये होणारे बदल, दुष्काळ किंवा अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम लोकचळवळीत रूपांतरित करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती, कुटुंब, संस्था आदींचा सहभाग महत्त्वाचा गणला आहे. पुणे जिल्ह्यातील रानमळा ग्रामपंचायतीने जन्म, विवाह आणि मृत्यू आदी प्रसंगाच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा पॅटर्न आता राज्यभरात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम राबविण्याचे लक्ष आहे. यात जन्म वृक्ष, शुभमंगल वृक्ष, माहेरची साडी, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष अशा प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करावे लागणार आहे. जन्माला बाळ आल्यास सदर कुटुंबाकडे जाऊन बाळाच्या जन्माचे स्वागत तसेच विवाहप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद म्हणून रोपटे द्यावे लागणार आहे. विवाहित मुलगी सासरी गेल्यास तिच्या आई-वडिलांना आपल्या लेकीप्रमाणे माया देऊन झाडांचे संगोपन करण्यासाठीे विनंती प्रशासनाला करावे लागणार आहे. इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण, नोकरी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी अथवा निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांचे रोपटे देऊन स्वागत करावे लागेल. स्मृती वृक्ष संबंधित दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वृक्ष, फळझाडांंची रोपे देऊन श्रद्धांजली अर्पण करावी लागेल तसेच सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या रोपाचे रोपण करून झाडाच्या रूपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याबाबत विनंती करावी लागणार आहे.अशी आहेत वृक्षारोपणाची उद्दिष्टेमहापालिका प्रतिवॉर्ड ६०० वृक्ष लागवड. ‘अ’ वर्ग नगर परिषद प्रतिवॉर्ड ३००. ‘ब’ वर्ग नगर परिषद १५०. ‘क’ वर्ग नगर परिषद आणि नगरपंचायती प्रतिवॉर्ड १००.