शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन,वाढीव बिलांचा मन:स्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:12 IST

शहराच्या जुनीवस्ती भागात बहुतांश वीजग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढीव बिले देण्यात आलीत.

ठळक मुद्देबडनेरावासी त्रस्त : ५० हजारांपर्यंतच्या धक्कादायक देयकांनी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : शहराच्या जुनीवस्ती भागात बहुतांश वीजग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढीव बिले देण्यात आलीत. दरम्यान भारनियमनासह वाढीव बिलांच्या मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.आधीच पाच तासाचे भारनियमन सुरू असून यात वाढीव बिलांची भर पडली आहे. सप्टेंबर महिन्यात वीज ग्राहकांना बिलांवरील रकम पाहून ग्राहक चक्रावून गेले आहेत. तब्बल तीन हजारांपर्यंतच्या युनिटचे बिले काही ग्राहकांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. काहींना तर ५० हजार रुपयांपर्यंत बिल ग्राहकांना मिळाले आहे. ज्यांना ५०० ते १००० रुपयांपर्यंतचे बिले यायची, त्यांना ५ ते १० हजार याहीपेक्षा अधिक रकमेची बिले आलीत.मीटरचे रीडिंग घेणे, बिल तयार करणे व ग्राहकांना बिले पोहोचते करणे असे एकूण काम खासगी एजंसीला सप्टेंबर महिन्यात सोपविण्यात आले आहे. जुनीवस्तीसाठी ही स्वतंत्र एजंसी नेमण्यात आली आहे.नवीन एजंसीच्या कामकाजातच ग्राहकांना प्रचंड बिले प्राप्त झाल्याची ओरड आहे. आॅगस्ट २०१७ या महिन्याचे बिले सुरळीत होते, असे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे.वाढीव बिलांमुळे जुन्यावस्तीतील वीज ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या जुन्यावस्तीतील कार्यालयामध्ये तक्रारी सोडविण्यासाठी पायपीट करावी लागते. ग्राहकांच्या बिलांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी गुंतले आहेत. ऐन दिवाळी उत्सवादरम्यान जुनीवस्तीत ग्राहकांना वाढीव बिलांचा व भारनियमनाचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले प्राप्त झाली आहेत. ग्राहकांना मन:स्ताप देणाºया एजंसीवर वीज वितरण कंपनीने नियंत्रण ठेवावे, तसेच चुकीच्या बिलांची दुरूस्ती करून द्यावी, असे संतप्तपणे बोलले जात आहे.हजारांच्यावर ग्राहकांना मोठ्या रकमेची बिलेजुनीवस्तीच्या वीज वितरण कार्यालयांतर्गत वीज ग्राहकांची एकूण संख्या साडेसहा हजारांपर्यंत आहे. यात सर्वच प्रकारचे ग्राहक आहेत. यापैकी एक हजारांच्यावर ग्राहकांना मोठ्या रकमेची देयके प्राप्त झालीत. सप्टेंबर महिन्याचे बिल व त्या आधीच्या महिन्याचे बिल भरूनसुद्धा काही ग्राहकांना अधिक रकमेची देयके देण्यात आलीत. जुनीवस्तीच्या कार्यालयात ग्राहकांची देयक दुरूस्तीसाठी एकच झुंबड होत आहे.जुन्यावस्तीतील काही वीजग्राहकांना सप्टेंबर महिन्याचे देयके अधिक रकमेचे आल्याची तक्रार आहे. यात योग्य ती दुरूस्ती केली जाईल.- संजय श्रृंगारे,अतिरिक्त कार्यकारी अभियंताउपविभाग क्र. ३ (एमआयडीसी)