शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे वजनकाटे नादुरुस्त

By admin | Updated: June 26, 2017 00:13 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी इलेट्रॉनिक वजनकाटे घेण्याचा ठराव पास करून....

वजनात तफावत : खरेदीतही अफरातफर, बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्षचेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी इलेट्रॉनिक वजनकाटे घेण्याचा ठराव पास करून यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र यातील बरेचशे काटे नादुरस्त आहेत, तर काही बंद अवस्थेत असल्यामुळे बाजार समितीने केलेल्या वजनकाट्यांच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. ६ जून २०१६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत शेतकऱ्यांच्या मालाची योग्य मोजणी व्हावी, यासाठी इलेट्रॉनिक वजनकाटे खरेदीचा ठराव पास केला. यासाठी बाजार समितीने सनवे इलेट्रिकल्स अ‍ॅण्ड इलेट्रॉनिक्स अमरावती या कंपनीकडून १५ वजनकाटे व १० इलेट्रॉनिक्स वजनी काट्याच्या मोडिफिकेशनचा ठराव यावेळी घेण्यात आला. १५ वजनी काट्यांचे २ लाख ८० हजार ९१२ रुपयांचे बिलसुद्धा अदा करण्यात आले. मात्र, २५ मार्च २०१७ रोजी झालेल्या आमसभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी विकत घेतलेले वजनकाटे चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे सनवे इलेट्रॉनिक & इलेट्रिकल्सचे मंजूर बिल देण्यात येऊ नये, असा ठरावसुद्धा पारित करून घेतला. १५ वजनी काट्यांचे खरेदी बिल बाजार समितीने अदा केले व १० वजनी काट्याचे बिल दिलेले नाहीत.८० ते ८५ किलो वजनाचे इलेट्रॉनिक वजनी काटे विकत घेण्याचे ठरविण्यात आल्यावरही बाजार समितिच्या सचिव व काही संचालकानी इलेट्रॉनिक वजन काटे कंपनीशी हात मिळवनी करीत ६० ते ६५ किलो वजनाचे काटे खरेदी केले. त्यामुळे घेण्यात आलेले वजनकाटे नादुरुस्त आहेत. त्यामुळे बाजार समितिने २२ वजनकाटे आपल्या गोडावूनमध्ये ठेवून दिले आहे. ३ वजनी काटेच बाजार समितीत दिसुन येत आहेत. तेही बंद अवस्थेत आहे.खविसंचा अहवाल सादर शासकीय तूर खरेदी (नाफेड) सुरू असताना या विकत घेतलेल्या वजनी काट्यावर वजन केले असता मोठ्या प्रमाणात वजनामध्ये तफावत आढळून आली होती. तसा लेखी अहवाल खरेदी विक्री संघ अंजनगाव सुर्जी यांनी बाजार समितीला सादर केला होता.आम्ही जे वजनकाटे बाजार समितिला दिले ते सुरळीत सुरू आहेत. पण बाजार समिती त्या वजनकाट्याची देखरेख व्यवस्थितरीत्या करीत नसल्यामुळे ते बंद पडत आहेत. - सुनील धोटे, वजनकाटे विक्रेताबाजार समितीमध्ये लावण्यात आलेली वजनीकाटे नादुरुस्त असून ते गोडावूनमध्ये ठेवण्यात आले आहे, तर काही सुरू आहेत.- गजानन नवघरे सचिव बाजार समिती, अंजनगाव