अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. सद्यस्थितीत ७१ हजारांवर कोरोनाग्रस्त व एक हजारांवर रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. या वाढत्या संसर्गापासून स्वत:चा व पर्यायाने कुटुंबाचा बचाव करण्यासाठी प्रशासनाद्वारा मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर व फिजिकल डिस्टंसचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा नवा स्टेन असल्याचे सांगण्यात येते. त्यातही डबल म्युटंट व्हेरियंट आहे. या विषाणूची संसर्ग क्षमता अधिक आहे व लक्षणे देखील बदलेली आहे. त्यामुळे खबरदारी व दक्षतेचा उपाय म्हणून डबल मास्क घालणे केव्हाही चांगले. अलीकडे सार्वजनिक ठिकाणी डबल मास्क घातलेल्या कितीतरी व्यक्ती दिसून येतात. कोरोना काळात त्रिसुत्रीचा वापर केल्यास आपण संसर्ग टाळू शकतो.
विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाद्वारा दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २० लाखांवर दंड विनामास्क नागरिकांकडून वसूल करण्यात आलेला आहे. याशिवाय दुसऱ्यांदा तोच व्यक्ती विनामास्क आढळून आल्यास त्यावर आता आपत्ती व्यवस्स्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार आहे. तसे आदेश यापूर्वीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
बॉक्स
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठीचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे चेहऱ्यावर मास्क लावणे आहे. त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारा रोज केल्या जात आहे. वाढत्या संसर्गात स्वत:चा बचाव करण्यासाठी आता अनेक नागरिकांद्वारा डबल मास्कचा वापर केला जात आहे. सध्याच्या वाढत्या संसर्गात डबल मास्कचा वापर करणे कोरोनापासून बचावाचा महत्त्वाचा उपाय आहे.
बॉक्स
कोरोनापासून बचावासाठी त्रिसूत्रीचा अवलंब महत्त्वाचा
* जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गात कोरोनापासून बचावासाठी त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे. यामध्ये पहिले मास्कचा वापर, दुसरा उपाय सॅनिटायझर किंवा साबणाने हात वारंवार धुणे, तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे किमान सहा फुटांचे अंतर राखणे हा आहे.
* सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क किंवा कापडाचे दोन मास्क एकाच वेळी वापरल्या जाऊ शकतात. संपूर्ण तोंड झाकेल असाच मास्क वापरावा, मास्क हा नाकाच्या वर असावा. अनेक जण मास्क हा हनुवटीवर लावलात, त्यामुळे कुठलाही फायदा होत नाही. कापडाचे मास्क रोज स्वच्छ धुवावेत व उन्हात वाळू घालावेत.
कोट
हे करू नका
एकदा मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याला वारंवार हात लावू नये. मास्क हा नाकाच्या वर असावा, मास्क हा शक्यतोवर तीन पदरी असावा. कोणी भेटल्यावर हनुवटीवरून मास्क खाली करून बोलू नये. कोरोना संसर्गापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स हा सवयीचा भाग बनला पाहिजे.
- विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
कोट
हे करा
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आहे. अशावेळी दोन दुहेरी मास्क वापराने योग्य पर्याय आहे. एका सर्जिकल मास्कवर दुसरा कापडी मास्क वापरला तरी चालेल. कापडाचे मास्कही चांगले आहेत. ते एकावर एक असे दोन वापरल्यास अधिक सुरक्षितता मिळते. गर्दीच्या ठिकाणी दुहेरी मास्कचा उपयोग केल्यास अधिक सुरक्षित आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
पाईंटर
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण : ७०,६९४
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : ६०,६२२
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : २,०६१
होम आायसोलेटेड रुग्ण : ६,९६२
पाईंटर
जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचा रेट : १६.०७
जिल्ह्याचा मृत्यूदर : १.४८