पोलीस आयुक्तांची माहिती : भाडेकरुंची नोंद करणे बंधनकारकअमरावती : घरे किंवा दुकानांमध्ये भाड्याने राहणाऱ्यांची माहिती घरमालकांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये देणे आता अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी दिली. भाडेकरूंबाबत पोलीस ठाण्यात माहिती न देणाऱ्या घरमालकांवर यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरात सक्रिय असामाजिक तत्त्वांचा संचार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. घरमालकांना दोन महिन्यांचा अल्टीमेटमपोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व घरमालक व दुकान मालकांनी कोणत्याही स्तरावर मालमत्ता, घर, दुकान भाड्याने दिले असेल तर त्यांनी भाडेकरुचे नाव व त्यांचा संपुर्ण पत्ता असलली माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. यासाठी पोलीस ठाण्यात घरमालकाला प्रपत्र अ नमुन्याचा अर्ज भरणे बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी ८ जुलै रोजी निर्गमित केले आहे. यासाठी घरमालकांना ६० दिवसांचा अल्टीमेटम् देण्यात आला आहे. पोलीस ठाण्याला माहिती न देणाऱ्या घरमालकावर त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी दिली.
-तर घरमालकांवर होणार कारवाई
By admin | Updated: July 16, 2014 23:49 IST