शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

आमसभेत हमरी-तुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:16 IST

विषयसूचीवरून जिल्हा परिषदेच्या आमसभेत शनिवारी पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे गटनेता प्रवीण तायडे व काँग्रेसच्या तळेगाव दशासर सर्कलच्या सदस्य अनिता मेश्राम एकमेकांवर धावून गेले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विषयसूचीवरून पेटला वाद, गोंधळात गुंडाळली सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विषयसूचीवरून जिल्हा परिषदेच्या आमसभेत शनिवारी पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे गटनेता प्रवीण तायडे व काँग्रेसच्या तळेगाव दशासर सर्कलच्या सदस्य अनिता मेश्राम एकमेकांवर धावून गेले. भाजपचे संजय घुलक्षे यांनी पीठासीन सभापती व सीईओंच्या आसनाजवळ पोहोचून विषयपत्रिका आपटली. या गदारोळातच अध्यक्षांनी पटलावरील सर्व विषय मंजूर करून सभा आटोपल्याचे घोषित केले. सत्ताधारी व विरोधकांनी एकच गर्दी केल्याने सभागृहाला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले होते.सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेजिल्हा परिषदेची १० सप्टेंबरची स्थगित आमसभा शनिवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झाली. अध्यक्ष नितीन गोडाणे यांनी सभेला सुरुवात केली. प्रारंभी प्रशासकीय विषयांना मंजुरी देण्यात आली. धारणी व चिखलदरा तालुक्यातील जि.प. अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी हजर राहत नाहीत. आठवडाभरात एक-दोन दिवस हजेरी लावून इतर दिवशी स्वाक्षरी करतात आणि पदाधिकाऱ्यांना हप्ते देतात, असा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला. त्यावर आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे यांनी आक्षेप घेतला.मेळघाटातील सदस्य दयाराम काळे, चिखलदरा पंचायत समितीच्या सभापती सविता काळे, महिला व बाल कल्याण सभापती वनिता पाल व इतर काही सदस्यांनी तायडे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, तायडे हे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. त्यानंतर काँग्रेसच्या अनिता मेश्राम यांनी विषयसूचीतील विषय घेण्याची मागणी करताच, प्रवीण तायडे पुढे आले. त्यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आणि ते समोरासमोर उभे ठाकले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. बसपाच्या सुहासिनी ढेपे यांनी अनिता मेश्राम यांना समजावित वाद सोडविला. त्यानंतरही तायडे व मेश्राम यांच्यात बाचाबाची सुरू होती. सुहासिनी ढेपे, वासंती मंगरोळे व अन्य सदस्यांनी पुन्हा दोन्ही सदस्यांना समजूत काढल्याने वाद निवळला. हा प्रकार थांबत नाही तोच भाजपचे संजय घुलक्षे यांनी नियोजनाच्या यादीत राजुरवाडी सर्कलमधील कामे नसल्याने अध्यक्षांसमोर येऊन विषयपत्रिका आपटली. गोंधळ वाढत गेल्याने अध्यक्षांनी सभेतील विषय मंजूर केल्याचे घोषित करून सभागृहातून काढता पाय घेतला.सभेला समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, सदस्य महेंद्रसिंग गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, प्रियंका दगडकर, सुहासिनी ढेपे, सुरेश निमकर, प्रकाश साबळे, शरद मोहोड, सुनील डिके, वासंती मंगरोळे, विठ्ठल चव्हाण, पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, सविता काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सानप, दिलीप मानकर, माया वानखडे, प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रदीप ढेरे, राजेंद्र सावळकर, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र येवले यांच्यासह सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.ज्येष्ठ सदस्य सभेला अनुपस्थितजिल्हा परिषदेच्या सभेला काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख व विरोधी भाजपचे पक्षनेते रवींद्र मुंदे बाहेरगावी असल्याने सभागृहात हजर नव्हते. सभागृहात घडलेल्या प्रकाराचा काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करतो, असे बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम सभापती जयंत देशमुख हे सभा आटोपल्यानंतर पोहोचले. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य प्रताप अभ्यंकर गैरहजर होते.जिल्हा परिषदेतील प्रकार निंदाजनक आहे. सदस्य प्रवीण तायडे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भविष्यात सभागृहात असा प्रकार घडणार नाही, याकरिता यापुढे आमसभेला पोलीस संरक्षण घेऊ.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषदजिल्हा परिषद सभागृहात भाजप गटनेता व काँग्रेस सदस्यामधील वाद राजकीय आहे. सभागृहाचे कामकाज हे शांततेने व्हावे, अन्यथा विकास व अन्य प्रश्नावर मंथन होऊ शकणार नाही. समन्वय, चर्चेतून विकासकामे अपेक्षित आहेत.- मनीषा खत्रीमुख्य कार्यकारी अधिकारीप्रवीण तायडे यांनी विषयसूचीच्या मुद्द्यावर असभ्य भाषेचा प्रयोग केला. हा सभागृहातील संपूर्ण महिला सदस्यांचा अपमान आहे. तायडे यांचा सदस्यत्व रद्द करावे.- अनिता मेश्रामजिल्हा परिषद सदस्य, काँग्रेसमेळघाटातील कामचुकार कर्मचारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना हप्ते पुरवितात. माझा आरोप सांघिक स्वरूपाचा आहे. त्यांनी अरे, का रे ने सुरुवात केल्याने सभागृहात वाद उपस्थित झाला. कुठल्याही चौकशीला मी तयार आहे.- प्रवीण तायडेभाजप गटनेता, जिल्हा परिषद