शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या वाटेवर 'ती' लिफ्ट ठरली निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 22:06 IST

रोज तपोवन ते पंचवटी चौकातील राठी विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आपल्या मावशीच्या घरून दररोज सहा किलोमीटर पायी चालत येत असताना एके दिवशी त्याने मागितलेली लिफ्ट आयुष्याचा प्रवास करणारी ठरली.

- चेतन घोगरेअमरावती- रोज तपोवन ते पंचवटी चौकातील राठी विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आपल्या मावशीच्या घरून दररोज सहा किलोमीटर पायी चालत येत असताना एके दिवशी त्याने मागितलेली लिफ्ट आयुष्याचा प्रवास करणारी ठरली. त्यामुळे रामच्या साथीला धावली पोलिसाची खाकी वर्दी असे बोल बोलले जात आहेत. त्या मुलाला शैक्षणिक मदत म्हणून शालेपयोगी साहित्य तसेच एक सायकल भेट देण्यात आली.राम मने (१४) हा विद्यार्थी  रोज तपोवन ते राठी विद्यालय रोज पायीच प्रवास करत होता. या प्रवासात तो नेहमी कोणत्याही व्यक्तीला लिफ्ट मागत असे. याच मार्गावर नेहमी प्रवास करणारे ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी रामला दोन ते चार वेळा आपल्या चारचाकी वाहनातून शाळेत सोडले. त्यांनी त्याला त्याच्या परिवाराबद्दल माहिती विचारली असता, तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे सांगितले.आई मोलमजुरी करून पोट भरते व तपोवन परिसरात राहत असलेल्या मावशीच्या घरी राहून शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्याला त्याच्या वडिलांबद्दल  विचारणा केली असता, दारुड्या बापाने उकीरड्यावर फेकल्याचे व त्याच्यापासून वेगळे होऊन आईनेच वाढविल्याचे त्याने सांगितले. माझ्या आईने मला उकीरड्यावरून उचलून आणले त्याचवेळी माझ्या मनाच्या हळव्या कप्प्यातून घरातून कायमस्वरूपी हद्दपार केले, असे तो म्हणाला. विलास कुलकर्णी यांनी त्याला शालेपयोगी साहित्य देण्याचे सांगितले. रामने नकार दिला. तू तुज्या आईला व मावशीला विचार मग माझ्याकडे ये, असे सांगून वाहतूक निरीक्षक कुलकर्णी तेथून निघून गेले. दुसºया दिवशी राम मने हा विद्यार्थी तपोवन परिसरात राहत असलेल्या विलास कुलकर्णी त्यांच्या घरी जाऊन मला फक्त दप्तर द्या, असा म्हणाला. कारण मी सध्या जे दप्तर वापरत आहे, ते पण माझ्या एका मित्राने दिले आहे, असे सांगताच  कुलकर्णी यांनी त्याचे दप्तर तपासले असता त्यामध्ये तीन फाटक्या वह्या मिळून आल्या. विशेष बाब म्हणजे नवव्या वगार्तील एकही विषयाचे पुस्तक त्याच्याकडे नव्हते. त्याचवेळी कुलकर्णी यांनी रामला काही तरी मदत करायची, असे ठरवले तसेच या मदतीस आणखीच भर पडली जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लिपिक देवानंद भोजे यांनी रामला सायकल देण्याचे कबूल केले. वाहतूक निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी नवीन दप्तर वर्षभरासाठी लागणारे नोटबुक कंपास, दोन पेन पाकीट, टिफिन, वॉटर बॅग व इतर शालेपयोगी साहित्य दिले वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी विनोद दाभणे यांनी गाइडचा संच दिला तसेच यापुढेसुद्धा  काहीही गरज भासली तर  निसंकोचपणे येऊन भेट, असे रामला  सांगीतले आयुष्यात पहिल्यांदाच एवढं नवसाहित्य पाहून रामच्या चेहºयावर  आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळात राम ने सायकलवर टांग मारली अन् हवेत तरंगत जात असल्याच्या अविर्भावात तो दिसेनासा झाला.

आयुष्यात मी मोठा माणूस बनणार रामने घरी जाताना या सर्वांचे मनापासून आभार मानत, मी आयुष्यात मोठा झाल्यावर मोठा माणूस बनण्याचं वचन दिलं.