शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

पाणी भरणे हेच एकमेव काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:32 IST

तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देगावात पाण्यासाठी वणवण : शिवारात संत्राबागा आॅक्सिजनवर; नागरिकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बागायतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची पाणीटंचाईमुळे रया गेली आहे.तालुक्यातील सधन गाव म्हणून आमलाची ओळख आहे. १०० टक्के शेती संत्र्याची. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक. परंतु, सध्या या गावात पिण्याचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागत आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच या गावात ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. ते टँकर आता अपुरे पडत असल्यामुळे लोकांना ३० ते ४० रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावात दोन कूपनलिका व चार हँडपम्प बसविले. मात्र, त्यास मर्यादा आल्या आहेत. गावाला भिवापूर तलाव व जळका धरणाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. परंतु, जानेवारी महिन्यातच हे स्रोत आटल्याने पाणीप्रश्न भीषण झाला आहे.गावाची लोकसंख्या पाहता, ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ६० ते ८० हजार लिटर पाणी मिळत आहे. शासनांकडून अतिरिक्त टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यंदाची पाणीटंचाई भीषण आहे.- रजनी मालखेडेसरपंच, आमला विश्वेश्वरसंत्राबागांना टँकरने पाणीपेयजलाचे संकट तीव्र असताना शिवारातील संत्राबागांचे हाल काही वेगळे नाहीत. शेकडो हेक्टरवरील संत्राबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रतिटँकर दराने पाणी विकत घेऊन संत्राबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, देऊन देऊन किती दिवस टँकरने पाणी द्यायचे, यालाही मर्यादा आहेत. यामुळे भविष्याच्या विचाराने संत्राउत्पादक हवालदिल झाले आहेत.पाथरगाव उपसा सिंचन प्र्रकल्प केव्हा?आमला विश्वेश्वर व लगतच्या परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, पाणीटंचाईची समस्या निकाली निघावी, यासाठी पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प तूर्तास निविदा प्रक्रियेत अडकला आहे. काम सुरु झाले तरी पुढील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे लाभ गावकऱ्यांना मिळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. हा प्रकल्प वेळेत झाला असता, तर संत्राबागा व त्यावर आधारलेली शेती शासनाला वाचविता आली असती, असे मत ग्रामस्थ गोपाल बकाले यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई