पाण्याचा अपव्यय... स्थानिक शिवाजीनगर चौकाकडून विमलाबाई देशमुख सभागृहाकडे जाणाऱ्या मार्गावर ‘फोर-जी’ चे केबल टाकताना शुक्रवारी सकाळी पाईपलाईन फुटली. चहुकडे पाण्याची कारंजी उडाली. कित्येक तास पाणी वाहत होते. एकीकडे जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे सावट असताना पाण्याचा हा अपव्यय सुजाण नागरिकांच्या पचनी पडला नाही. यासाठी जबाबदार घटकांवर कारवाई अपेक्षित आहे.
पाण्याचा अपव्यय...
By admin | Updated: June 3, 2016 23:58 IST