शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकेत पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:46 IST

मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी वनविभागाने नजीकच्या तलावातून पाण्याची चक्क चोरी चालविली आहे.

ठळक मुद्देपाझर तलावात इंजीन लावले : मोर्शी रोहयो परिक्षेत्राचा अफलातून कारभार

आॅनलाईन लोकमतअमरावती : मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी वनविभागाने नजीकच्या तलावातून पाण्याची चक्क चोरी चालविली आहे. दरदिवशी तलावातून हजारो लिटर पाणी रोपवाटिकेमध्ये रिते केले जात आहे.मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड तलावाला लागून रोजगार हमी योजनेमधून रोपवाटिका तयार करण्यात आली. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी वनविभागाने त्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी बोअर किंवा विहीर तयार करणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून रोपवाटिकेतील रोपांना वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाझर तलावानजीक इंजिन बसवून लोखंडी पाइपने पाणी आणून रोपवाटिकेतील टाक्यांमध्ये गोळा केले जाते आणि ते रोपांना देण्यात येत आहे.दिवाणखेड गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, याकरिता वनक्षेत्रावर या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली. मात्र, रोहयो रोपवाटिकेत कार्यरत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कसलीही परवानगी न घेता पाणी चोरी करून रोपटे जगविण्याची शक्कल लढविली आहे.रोपे जगविण्यासाठी पाणी आवश्यक असल्यास नियमानुसार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून परवानगी घेऊनच तलावातून पाण्याची उचल करणे अपेक्षित आहे. शासकीय विभाग नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी तत्पर असतात. अशा स्थितीत संबंधित वनाधिकाºयांनी हा प्रकार कशासाठी करावा, हा प्रश्न उपस्थित होत आहे.सिंचन विभाग अनभिज्ञदिवाणखेड येथील पाझर तलाव जि.प.च्या अखत्यारीत येतो. या तलावातून पाण्याची चोरी होत असताना सिंचन विभाग अनभिज्ञ आहे. रोपवाटिकेतील रोपांना व इतर कामांसाठी पाण्याची गरज असताना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी रीतसर परवानगी घेऊन तलावातील पाण्याची उचल करणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत दरदिवशी हजारो लिटर रिते केले जात असल्याचे वास्तव आहे.वनविभाग सिंचन तलावातून पाणी घेत असल्याबाबत परवानगी घेतली अथवा नाही. याबाबत तपासले जाईल. यात काही गैर असल्यास नियमानुसार कारवाई करू.- प्रमोद तलवारे,जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद