लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याला क्युरिंग सुद्धा करणे गरजेचे असून याकरिता एकीकडे पाणीटंचाइमुळे नागरिकांना एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, तर दुसरीकडे क्युरिंगकरिता टँकरने पाणी आणावे लागत असल्याची परिस्थिती बांधकाम विभागावर ओढवली आहे.उन्हाचा पारा वाढला असल्याने क्युरींसाठीसुद्धा अधिक पाणी लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी भूजल पातळी खोल गेली आहे. विहिरीसुद्धा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाला अनेक ठिकाणी बोरवेल करणे शक्य होत नाही. त्याकारणाने त्यांना बाहेरून ज्या ठिकाणी पाणीसाठा आहे त्या ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. मात्र, अनेक ठिकाणी बांधकाम विभागाच्या क्युरिंगला पाणी कमी पडत असल्याचीसुद्धा ओरड होत असून, यामुळे कामाच्या दर्जावर याचा परिणाम होत आहे.शहरात कठोरा नाका, शेगाव नाका ते जुने कॉटन मार्केट, बसस्थानक ते पोलीस पेट्रोलपंप, तसेच पंचवटीचौकापासून तर इर्विन चौक अशा अनेक ठिकाणी बांधकाम विभागाचे व मनपाचे कामे सुरू आहेत. त्यासाठी शेकोडो टँकरची रोज गरज भासत आहे.बांधकाम विभागाच्या कामांना गती हवीसार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात अनेक मुख्य मार्गावर काँक्रीटीकरणचे रस्ते करण्यात येत आहे. परंतु अनेक ठिकाणी कामेही मंद गतीने सुरू असल्याची जनतेची ओरड होत आहे. एका बाजूचाच रस्ता वाहतुकीला मोकळा केल्याने वाहनांची कोंडी होऊन रोज प्रत्येक मार्गावर किरकोळ अपघात होत आहेत.
रस्त्याच्या क्युरिंगसाठी टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:54 IST
शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याला क्युरिंग सुद्धा करणे गरजेचे असून याकरिता एकीकडे पाणीटंचाइमुळे नागरिकांना एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, तर दुसरीकडे क्युरिंगकरिता टँकरने पाणी आणावे लागत असल्याची परिस्थिती बांधकाम विभागावर ओढवली आहे.
रस्त्याच्या क्युरिंगसाठी टँकरने पाणी
ठळक मुद्देउन्हाचा तडाखा : पंचवटी ते इर्विन मार्गावरील सिमेेंट क्राँक्रिटीकरणाचे काम