शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

अमरावती विभागात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: May 15, 2014 02:17 IST

वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे

१६ गावांचा समावेश : मागील वर्षी पाणीपुरवठय़ासाठी २0१ टॅंकरचा वापरअमरावती : वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे. मोठय़ा प्रमाणावर झालेला पाऊस त्यासोबतच प्रशासनाचे पाणीटंचाई निवारणासाठी झालेले कोटेकोर प्रयत्न यामुळे विभागात सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच महिन्यात तब्बल २0१ टँकरचा उपयोग पाणी पुरवठय़ासाठी करावा लागला. मात्र त्यातुलनेत यावर्षी पाणी टंचाईची स्थिती विभागात सुसह्य आहे.गतवर्षी अवर्षणाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १४८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांची तहान भागविण्यासाठी १९३ टँकर प्रशासनाला लावावे लागले. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. या चार गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाने १0 टँकर लावले आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील ११ गावांना पाणीटंचाईची झळ बसली. यावर्षी अमरावती जिल्ह्यात ८ गावे पाणीटंचाईसदृश आहेत. येथे पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाकडून ८ टँकर लावण्यात आले आहेत.२0१३ मध्ये १७९ गावे विभागात पाणीटंचाईच्या विळख्यात होती. मात्र यावर्षी फार कमी गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात ४, वाशिममध्ये ९ आणि यवतमाळ जिल्ह्यात ७ गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. यावर्षी अकोला व वाशीम जिल्ह्यात एकही गाव पाणीटंचाईने ग्रस्त नाही.भूजल पातळीत झालेल्या कमालीच्या सुधारणेचा हा परिणाम आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. याठिकाणी ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अवकाळी पाऊस, खरिपात सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, तसेच अनुभवलेला गारपिटीचा तडाखा या सर्वांचा परिपाक म्हणजे भूजल पातळीत झालेली समाधानकारक वाढ २0१४ चा उन्हाळा सुसह्य करीत आहे. (प्रतिनिधी)