शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पाणीपुरवठा करणारे टँकर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:53 IST

एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.

ठळक मुद्देशासन झोपेत : दीड महिन्यांपासून आदिवासींची पाण्यासाठी भटकंती

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. पाण्यासाठी वणवण सुरू असताना प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीचा खेळ होत असल्याचा संताप आदिवासींमध्ये आहे.उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांंना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नऊ गावात टँकरने पुरवठा करण्याचे प्रस्ताव धारणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही.आदिवासी तहानलेलेचचिखलदरा तालुक्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदचे चार, अचलपूर व दयार्पूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रत्येकी दोन असे आठ टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. त्यातील एक टँकर चांदूर रेल्वे येथे पाठविण्यात आला. दुसरा टँकर अंजनगाव तालुक्यातील चिंचोना येथे पाठविण्यात आला आहे. दोन टँकर निवडणूक कामानिमित्त ठेवण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे टँकर नेमके कोठे गेले, याची अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही.जिल्हा प्रशासन केवळ पाणीटंचाईच्या बैठका कागदावरच घेऊन वेळ मारून नेत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पहाटे ४ वाजतापासून आदिवासींची दऱ्याखोºयातून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.१७ गावात भीषण टंचाईतालुक्यातील पिपादरी, सोमवारखेडा, धरमडोह, बहाद्दरपूर, भिलखेडा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी आणि मनभंग या नऊ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दिली. मलकापूर, खिरपाणी, कोरडा, कालापांढरी, हतरू, घाणा, खंडुखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी काही गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. परंतु, टँकरच नसल्याने आदिवासींची पायपीट सुरू आहे. दुसरीकडे हातपंप नादुरुस्त व पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहिरीसुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत.टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन आले असले तरी अजूनपर्यंत तालुक्यात एकही टँकर आलेला नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू आहे.- नरेंद्र ठाकरे, कनिष्ठ सहायक, पाणीपुरवठा विभागपं. स. चिखलदरानिवडणूक महत्त्वाचीच, मात्र आदिवासींचा जीवसुद्धा मोलाचा आहे. मेळघाटवासी महिनाभारापासून पाणीटंचाईस सामोरे जात असताना प्रशासनाची लेटलतिफी संतापजनक आहे.- सुनंदा काकडजिल्हा परिषद सदस्य