शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बडनेऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत

By admin | Updated: May 9, 2014 01:40 IST

पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे.

भीमटेकडी येथील जलकुंभावर ताणअमरावती : पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविला आहे. १२ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे संकेत आहेत.वाढती लोकसंख्या आणि नागरी वस्तीचा व्याप लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शासनाकडे नवीन चार जलकुंभ, विस्तारीत भागात जलवाहिन्या टाकणे, तपोवन येथे जलशुध्दीकरण केंद्र व सिंभोरा येथे पंप बसविणे असा ४४.४४ कोटी रूपयांचा प्रस्ताव नगरोत्थानअंतर्गत पाठविला होता. मात्र, ही योजना मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनीधींचे प्रयत्न कमी पडले. परिणामी बडनेरा, मायानगर, नागपुरी गेट व मालटेकडी येथे नवीन जलकुंभ निर्माण करता आले नाहीत. अशातच बडनेरा जुनीवस्तीतील जलकुंभाचे आयुष्य संपल्याने अप्रिय घटना घडण्यापूर्वीच हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे बडनेरा शहराला नवीवस्तीच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. परंतु पाणी मुबलक असतानादेखील जलकुंभाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. हीच स्थिती गोपालनगर व मायानगरातही आहे. या भागात अनेक वर्षांपासून जलकुंभ निर्मितीचा प्रस्ताव आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने पाणी पुरवठय़ासंबंधीची कामे करता आली नाहीत. हे शल्य मजीप्राला आहे. बडनेरा व मायानगर येथील उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मजीप्राचा आहे. त्यामुळे मजीप्राने जिल्हाधिकार्‍यांना वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल पत्राव्दारे कळविला आहे. बडनेरा व मायानगर वगळता उर्वरित शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा मानस मजीप्राचा आहे. (प्रतिनिधी) बडनेरा येथे २0 लाख तर मायानगरात १0 लाख रूपये खचरून जलकुंभ बांधायचे आहेत. निधी नसल्याने हे काम लांबणीवर पडले आहे. जलकुंभाशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे तुर्तास दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.-अरविंद सोनार, कार्यकारी अभियंता,मजीप्रा■ भीमटेकडी येथील जलकुंभावरून मायानगर, गोपालनगर, यशोदानगर, मोतीनगर, दस्तुरनगर, जुने बायपास लगतची लोकवस्ती आदी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभावरून क्षमतेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असल्याने ताण वाढला आहे. तपोवन येथील जलशुद्धीकरण कें द्रावरून पाणी खेचल्यानंतर जलकुंभाव्दारे टप्प्याटप्प्यात पाणीपुरवठा करण्याची कसरत मजीप्राला करावी लागत आहे.