शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटी ६६ लाखांचा पाणीपुरवठा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:46 IST

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत अंजनगाव सुर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे ६.६६ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल. नगरविकास विभागाने २६ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

ठळक मुद्देअंजनगाव नगर परिषदेकडे जबाबदारी : पेयजलाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत अंजनगाव सुर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे ६.६६ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल. नगरविकास विभागाने २६ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली.राज्यातील नागरी भागात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबविले जाते. त्याअनुषंगाने नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगर परिषद प्रशासन संचालनालायमार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे मान्यतेकरिता सादर केला होता. या प्रकल्पास मजीप्राने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाली. ६.६६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प कार्यारंभ आदेशाच्या १५ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रकल्पामुळे अंजनगाव सुर्जी शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल. ६.६६ कोटींपैकी ५.६६ कोटी रुपये राज्य सरकार देणार असून, नगर परिषदेला ९९.९० लाख रुपये स्वहिस्सा टाकावा लागणार आहे. एकूण रकमेपैकी २,५१ कोटी रुपये वितरण व्यवस्थेवर खर्च होईल.मजीप्राची ‘पीएमसी’ म्हणून निवडप्रकल्पाचे कार्यान्वयन अंजनगाव सुर्जी नगर परिषदेमार्फत करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत. सदर प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अर्थात पीएमसी म्हणून नियुक्त करणे बंधनकारक आहे. त्याबाबत आवश्यक ठराव नगर परिषदेने करावा. प्रक ल्प किमतीच्या ३ टक्के इतके पीएमसी चार्जेस नगरपरिषदेने मजीप्रास स्वनिधीतून प्रदान करावे लागेल.बंधनकारक सुधारणाप्रकल्प मंजुरीच्या पहिल्या वर्षात नगर परिषदेने कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद सुधारणा याची १०० टक्के अंमलबजावणी बंधनकारक राहील. उचित उपभोक्ता कर लागू करून किमान ८० टक्के वसुली नगर परिषद प्रशासनास बंधनकारक आहे.वैकल्पिक सुधारणामलनि:सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी भागातील सांडपाण्याची पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर करण्याबाबतच्या घटकांचा डीपीआरमध्ये समावेश करावा, याशिवाय नगर परिषदेने त्यांच्या मालकीच्या इमारतीवर पर्जन्यजल संचय करण्याचे निर्देश आहेत.