शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

हतरूच्या सरपंच ढाण्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष, मेळघाटात पाणी पेटू लागले, एकझिरा, कोयलारी, पाचडोंगरीत टँकरची मागणी नरेंद्र जावरे चिखलदरा : उन्हाळ्याची चाहूल ...

प्रशासनाचे दुर्लक्ष, मेळघाटात पाणी पेटू लागले, एकझिरा, कोयलारी, पाचडोंगरीत टँकरची मागणी

नरेंद्र जावरे

चिखलदरा : उन्हाळ्याची चाहूल लागताच मेळघाटातील आदिवासी पाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासणार असल्याचे दृश्ये दिसू लागली आहेत. अतिदुर्गम हतरु येथील सरपंच ढाण्यात कृत्रिम पाणीटंचाई असून, एकझिरा, कोयलारी व पाचडोंगरी या तीन गावांत टँकरची आवश्यकता भासू लागली आहे.

चिखलदरा तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि विविध उपक्रम राबविते. पाणीटंचाईचा आराखडा दरवर्षी जिल्हास्तरावर राबविला जात असताना, सदर गावे टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही. पाणीपुरवठ्याच्या त्याच त्या योजनांवर दुरुस्तीपोटी होणारा लाखो रुपयांचा खर्च योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारा आहे. पाण्याची पातळी खोलवर जात असताना हातपंपाची पातळी कायम राहावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन पूर्णत: ढेपाळले आहे.

शाश्वत योजना हव्यात

मेळघाटातील अतिदुर्गम भाग म्हणून हतरूची ओळख आहे. तेथील सरपंच ढाण्यात गतवर्षी विहिरीचे खोदकाम करण्यात आले. त्या विहिरीतून सरपंच ढाण्यातील आदिवासींना पाणी काढण्यासाठी रांग लावावी लागत असल्याचे चित्र आहे. नळ योजनचा प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून दाखल करण्यात आला असला तरी प्रशासकीय पातळीवर तो गुंडाळून ठेवल्याची माहिती पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी दिली. एकझिरा, पाचडोंगरी व कोयलारी या तीन गावांत दोन आठवड्यांपासून पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने तेथील सरपंचांनी चिखलदरा पंचायत समितीला टँकरची आवश्यकता असल्याचे सुचविले आहे.

कोट

हतरू येथील सरपंच ढाण्यात पाणीटंचाईसंदर्भात ग्रामसेवकांना माहिती मागितली आहे. तीन गावांत टँकरचा प्रस्ताव येताच पाहणी केली जाईल. वरिष्ठांनी मंजूर करताच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.

- नरेंद्र ठाकरे, पाणीटंचाई निवारण कक्ष, पंचायत समिती, चिखलदरा