शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावात पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:59 IST

तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देबेंबळा व साखळी नद्या कोरड्या : गेल्या सात वर्षांत यंदा कमी पावसाची नोंद

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत खळाळून वाहणाऱ्या या नद्यांची धार काही दिवसापूर्वीच बंद झाली आहे. नदीपात्रात फक्त खोलगट भागात पाण्याचे डबके तेवढे शिल्लक उरले आहेत.गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा फक्त ५११ मि.मी. इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गावागावांतून वाहणारे नाले तर कधीचेच कोरडे पडले. यंदा जानेवारीपासूनच काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मंगरुळ चव्हाळा येथील साखळी नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करण्यात आले होते. पण, नदीलाच पाणी नसल्याने तेथील बंधाऱ्यात पाणी अडून साठले नाही. गेल्या वर्षभरापासून अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. आताच येथे पाणी टंचाईची झळ गावकऱ्याना सोसावी लागत असल्याचे येथील ग्रामस्थ अतुल ठाकूर यांनी सांगितले.तालुक्यात ६८ ग्रामपंचायती असून, गावांची संख्या १२९ आहे. गावोगावी आगामी काळात उग्र होऊ पाहणाऱ्या पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. शेतातील विहिरींची पाण्याची पातळी खालावत असल्याने फळबागा व रबी हंगाम धोक्यात आला आहे. प्रशासनाने वेळीच व्यवस्थापन न केल्यास आगामी काळात भीषण टंचाईचे सावट आहे.परिसरातील सर्वांत मोठी नदी असलेली साखळी दोन महिन्यांपूर्वीच कोरडी पडली. गावाच्या शिवारातील नाला कोरडा ठणठणीत अहे, नदी-नाले कोरडे पडल्याने जनावरांना शिवारात कुठेही पाणी नाही. जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाईचे संकेत आताच स्पष्टपणे दिसू लागले आहेत.- रूपाली सुनील इंझळकरसरपंच, सालोडगावालगत वाहणारी जळू नदी कोरडी झाली आहे. डिसेंबरनंतरच पाणीटंचाई जाणवणार आहे, विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. शेतातील विहिरींना पाणी कमी असल्यामुळे यंदा रबीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.- राजेंद्र सरोदेमाजी सरपंच, माहुली चोर