शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई; उपाययोजना ८०० प्रस्ताावित, मंजूर फक्त ९६ नळ योजनेच्या दुरुस्तीचे एकही काम सुरु नाही

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 22, 2023 18:58 IST

त्यापैकी ४४ पुर्ण झाल्यात तर ४४ अद्यापही प्रगतीत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मे, जूनमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणार आहे.

अमरावती : मार्चपश्चात उन्हाची दाहकता वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ८०० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात ९६ उपाययोजनांना मंजूरी मिळालेली आहे. त्यापैकी ४४ पुर्ण झाल्यात तर ४४ अद्यापही प्रगतीत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मे, जूनमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणार आहे.

जिल्ह्यात मेळघाट वगळता उर्वरित तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले व पाणी पातळीत वाढ झाली. मात्र, मार्चमध्ये चांगलेच तापायला लागल्याने दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. याशिवाय काही भागात खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाद्वारा करण्यात आले.यावर्षी नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीची १३५ कामे सुचविण्यात आलेली असतांना ५० कामे मंजूर आहेत. मात्र, एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. तात्पूरत्या पुरक नळ योजनेची १० कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी चार कामांनाच मंजुरी मिळालेली आहे. एकही काम सुरु नाही. खासगी ४२९ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतांना पाच उपाययोजनेला मंजूरी मिळाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

तहान लागल्यावर खोदणार विहीर

पाणीटंचाईचा सामना करण्यास २०७ नवीन विंधन विहीर, कूपनलिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी ३५ ला मंजूरी मिळालेली आहे. यापैकी एकही काम सुरु झालेले नाही, त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा आरोप आहे.