शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव ...

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर यामुळे भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जून महिना सुरू झाला तरी जिल्ह्यातील या गावांमध्ये पाण्याची समस्था कायम आहे.

जिल्ह्यातील ६७ गावांपैकी १८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी पावसाने दिलेला दगा आणि गत वर्षी दिलेला हात. यामुळे टंचाईग्रस्त विदर्भातील गावांत्या संख्येत मोठी भर पडली आहे. जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानुर, मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा ही धरणे जिल्ह्याला वरदान ठरली आहेत. परंतु तरीही धारणी व चिखलदरा मेळघाटातील भागात तसेच मोर्शी तालुक्यातील काही भागात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही मोर्शी तालुक्यात सर्वात जास्त गावे टंचाईग्रस्त आहेत. सध्या पाणीटंचाई ज्या गावात निर्माण झाली त्या गावात टँकर किंवा विहीर अधिग्रहाणाव्दारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात जे १८ टँकर सुरू आहेत. त्यातील एकट्या चिखलदरा तालुक्‍यात १७ टँकर सुरू आहेत. तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बॉक्स

या गावांना टँकरने पाणीपुरवठा

चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, अलाडोह, आकी, मलकापूर, सोमवारखेडा, मोथा, धरमडोह, बहादरपूर, तारूबांदा, तोरणवाडी, बगदरी, सोनापूर, रायपूर, सावऱ्या, आवागढ, कोयलारी, पाचडोंगरी, आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय विहीर अधिग्रहण

अमरावती १३, नांदगाव खंडेश्र्वर २०, भातकुली १, तिवसा ३, मोर्शी १४, वरूड ४, चांदूर रेल्वे २०, अचलपूर १२, चिखलदरा २९, धामणगाव रेल्वे २ आदी तालुक्यातील गावांना ११८ विंधन विहीर आणि खासगी विहिरींव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.