शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

By admin | Updated: June 20, 2015 00:38 IST

गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा : भुयारी गटारातील पाणी लोकांच्या घरात, नागरिकांची प्रचंड त्रेधा अमरावती : गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली आणि दोन तासपर्यंत धो-धो पाऊस बरसला. पावसाळ्यातील हा पहिलाच दखलपात्र पाऊस होता, असे म्हणण्यास हरकत नाही. या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांचे दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंचे नुकसान झाले. कित्येकांना रात्रभर घरात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. फरशी स्टॉप, धनश्री कॉलनी परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक राजू महल्ले यांच्याकडे केल्या. शेवटी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घराशेजारी नाल्या खोदून पाणी बाहेर काढले. शहरातील विविध भागांत अशीच काहीशी परिस्थिती होती. माजी महापौैर वंदना कंगाले यांच्या प्रभागातील आदर्श कॉलनीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. शंकरनगर प्रभागात पावसामुळे एक वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हे झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. तर प्रशांतनगरात फ्लॅटची संरक्षण भिंत कोसळल्याने गोंधळ उडाला. ही भिंत आसपासच्या नाल्यांमध्ये कोसळल्याने नाल्या अवरूध्द झाल्या. परिणामी पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. दरवर्षीच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कुचकामी ठरते. संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना असूनही समतोल साधता येत नाही. नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्यास तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी लावल्यास अशी परिस्थिती उद्भवण्याचा धोका कमी होतो. मात्र, सफाई कंत्राटदारांची मनमानी आणि महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदैव साफसफाईचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. याचाच परिणाम यंदा पुन्हा एकदा जाणवला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.