शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शहरातील पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:41 IST

मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देमागणीत दुपटीने वाढ : नियमित पाणीपुरवठ्यात मजीप्रा अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातही पाणी पुरवठ्याची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अमृत योजनेची कामे पूर्ण झाल्यावर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही मजीप्राने दिली. मात्र, अमृत योजनेची ६० टक्के कामे अद्यापही शिल्लक असल्यामुळे सद्यस्थितीत तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चिन्हे नाहीत. मजीप्राकडे ९० हजार ५० ग्राहकांची संख्या असून, या सर्व ग्राहकांना १६ पाणी टाक्यावरून सद्यस्थितीत दररोज ११२ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्यामुळे मजीप्राकडे पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यामुळे ग्राहकांना नियमित पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मजीप्राकडून खालच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, उंच ठिकाणी पाणीटंचाईची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. बडनेरात एकाच जुन्या टाकीवर पाणीपुरवठ्याची मदार असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गोपालनगर, मराठा कॉलनी, शहरालगतच्या काही भागांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे.अमृतमधील कामांच्या दिरंगाईमुळे कलहअमृत योजनेतील ६० टक्के कामे अजूनही अपूर्ण असून, ती कामे संथगतीने सुरू आहेत. पाइप लाइन टाकणे, नळ जोडणी करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्यासह अन्य अनेक कामे रखडलेली असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.पाणी मिळत नाहीमासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राची ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आहे. मात्र, सद्यस्थितीत ११२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असताना मागणीही दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची मागणी पाहता, ग्राहकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे.राधानगरातील पाईपलाईन फुटलीअमरावती : राधानगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये सिमेंट रस्त्यावरील पाईपलाईन फुटल्यामुळे या भागात नळ येतात तेव्हा हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. गेल्या आठ दिवसांपासून नागरिक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून, या ठिकाणी काही नागरिकांनी मजीप्राकडे तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्याने पाणी वाहत आहे. एकीकडे एक दिवसआड पाणीपुरवठा, तर दुसरीकडे असा अपव्यय सुरू आहे. संबधित अभियंत्यांनी या भागाची पाहणी करून समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.शंकरनगरातील विहिरींची पातळी गेली खोलअमरावती : शंकरनगरातील सार्वजनिक व घरगुती विहिरींची पातळी खोल गेली असून, यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी मजीप्राच्या नळाला एक दिवसाआड अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विहिरीवरून अंदाजे १०० च्या वर कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी राजापेठ उड्डाणपुलाच्या कामासाठी एका कंपनीने स्मशानभूमीलगत खुल्या भूखंडावर चार ते पाच बोअरवेल केल्या आहेत. हजारो लिटर पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजल पातळी खोल गेली असल्याने परिसरातील बहुतांश खासगी विहिरी आटल्या आहेत.विहिरी व बोअरवेल आटल्याने मजीप्राच्या पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे मोठा ताण वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर मागणी कमी होईल. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.- किशोर रघुवंशी,उपविभागीय अभियंता, मजीप्रा