शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विजय कुबडेवर खबऱ्यांची नजर

By admin | Updated: January 18, 2017 00:08 IST

कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारा विजय कुबडे पसार झाला असून त्याच्या घरावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

सावकारी व्यवसायात गौडबंगाल : पोलीस चौकशीला वेगअमरावती : कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारा विजय कुबडे पसार झाला असून त्याच्या घरावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. सोमवारी पोलिसांनी रचलेला सापळा अयशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमिवर कुबडेचा शोध घेण्यासाठी खबऱ्यांची मदत घेतली जात आहे. खबरे कुबडेच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा दावा कोतवाली पोलिसांनी केला आहे. महादेव कुबडे या परवानाधारक सावकारी पेढीचा प्रोप्रायटर म्हणून शहर कोतवाली पोलिसांनी त्यांचा मुलगा विजय कुबडेभोवती चौकशीचा फास आवळला आहे. त्याच्याविरूद्ध पुरावे गोळा करण्याला पोलिसांनी प्राधान्य दिले असून त्यादृष्टीने तपासाला गती देण्यात आली आहे. सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी महादेव कुबडे परवानाधारक सावकाराविरूद्ध फौजदारी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपासाला दिशा दिली. आतापर्यंत कुबडे ज्वेलर्स या प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले असून कर्जदारांची यादी हस्तगत करण्यात आली आहे. कर्जदारांची यादी, त्यांच्या गहाण वस्तू व एकंदर दस्तऐवजांवरून कुबडे ज्वेलर्सचा गोरखधंदा उघड होण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीने तपास अधिकारी गोकुल ठाकूर यांनी तपासाला गती दिली आहे. पोलिसांनी मंगळवारी विजय कुबडेच्या घरी भेट देऊन त्याचा शोध घेतला. मात्र, ते घरी सापडले नाहीत. (प्रतिनिधी)नावावरून पोलीस 'कन्फ्युज'उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी १२ जानेवारी रोजी महादेवराव नामदेवराव कुबडे (६०, परवानाधारक सावकार, दुकान गांधी चौक) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. महादेव कुबडे हयात व्यक्ती असल्याचे समजून डायरी अंमलदाराने तक्रार नोंदविली. सुरूवातीचे दोन दिवस महादेव कुबडेंचाच पोलिसांकडून शोध घेण्यात आला. दोन दिवसांनी या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गोकुल ठाकूर यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी केलेल्या चौकशीत महादेव कुबडे नावाची परवानाधारक सावकाराची फर्म असल्याचे लक्षात आले. त्यापूर्वी पोलिसांनी पाठविलेल्या ‘डेली क्राईम रिपोर्ट’मध्ये महादेवराव कुबडे यांना हयात मानून त्यांचे वय, पत्ता व इतर माहिती देण्यात आली. महादेवराव कुबडे यांनाच आरोपी संबोधण्यात आले. प्रत्यक्षात महादेवराव कुबडे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महादेव कुबडे हे परवान्यावरील नाव कायम ठेवत त्यांचा मुलगा विजय याने महादेव कुबडे या फर्मच्या नावे प्रोप्रायटर म्हणून नव्याने सावकारी परवाना घेतला.