शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 23, 2023 16:46 IST

खरिपाची लगबग, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर ६२ कक्ष स्थापित.

गजानन मोहोड/अमरावती: खरीप हंगाम दीड महिन्यांवर आल्याने कृषी विभागाची लगबग सुरु झालेली आहे. हंगामासाठी कृषी निविष्ठामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकरिता पश्चिम विदर्भात यंदा कृषी निविष्ठा विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई होण्यासाठी तालुकास्तरावर ६२ तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी दिली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार २८ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भाचा आढावा घेणार आहे. यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. पेरणी काळात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात, त्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. यासाठी १७१ गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते वेळेत व योग्य भावाने उपलब्ध व्हावीत, यासाठी अमरावती जिल्ह्यात १५, यवतमाळ १७, अकोला ८, वाशिम ७, बुलडाणा १४ व विभागस्तरावर १ असे एकूण ६२ भरारी पथकांचे गठण करण्यात आल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या एकच टोल फ्री १८०० २३३ ४००० हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ५६ समित्या

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तक्रारी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर ५६ तक्रार निवारण समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४, यवतमाळ १६, अकोला ७, वाशिम ६ व बुलडाणा जिल्ह्यात १३ आहेत. याशिवाय ६२ निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याचे कृषी सहसंचालकानी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती