शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तपासावर गृहराज्यमंत्र्यांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:20 IST

शीतल पाटील हत्याकांडाविषयी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. गाडगेनगर पोलिसांचे तपासकार्य समाधानकारक असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देसीपींसोबत चर्चा : हत्याकांडामागील पार्श्वभूमी जाणून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील हत्याकांडाविषयी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. गाडगेनगर पोलिसांचे तपासकार्य समाधानकारक असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.अधिवेशनानंतर पहिल्यांदाच शहरात आलेल्या गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी महिन्याभरातील गुन्हेविषयक बाबींचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, रणजित पाटील यांनी बहुचर्चीत शीतल पाटील हत्याकांड पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडून जाणून घेतले. आढावा भेटीदरम्यान गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी याप्रकरणाची विस्तृत माहिती तथा तपासादरम्यान हाती आलेल्या बाबींची माहिती रणज्जित पाटील यांना दिली. यादरम्यान गाडगेनगर पोलिसांच्या चौकशीसंदर्भात समाधान व्यक्त करीत ना. पाटील यांनी पोलिसांना दिशानिर्देश दिले.मोबाइल शोधकार्य सुरु ठेवणारशीतल पाटीलचा मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील विहिरीचा उपसा सुरू केला होता. ४० ते ५० फूट पाणी उपसा केल्यानंतरही तळापर्यंत पोहोचता आले नाही. अजूनही विहिरीत १० ते २० फुट पाणी आहे. याकरिता पंधरा हजारांवर खर्च होऊन गेला. त्यामुळे आता वीज जोडणी घेऊन मशीनद्वारे पाण्याचा उपसा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सोमवारपासून पुन्हा पोलीस विहिरीचा उपसा करणार आहे.रहमानची न्यायालयीन कोठडीत रवानगीआक्रमण संघटना व वसुधंरा फाऊंडेशनच्या पदाधिकारी शीतल पाटील यांच्या हत्याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अ‍ॅड. सुनील गजभिये, रहमान खान, राजेश्री गजभिये व शिवदास गोंडाणेला अटक केली. सुनील गजभिये व त्याच्या पत्नीची पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर दोघांचाही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. रहमानला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.रहमानला घेऊन पोलीस चांदूर बाजार रोडवरगाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह पोलीस रविवारी चांदूरबाजार रोडवर पोहोचले होते. सुनील गजभिये, शीतल व रहमान कोणत्या मार्गाने गेले आणि कोणत्या मार्गाने परतले, त्यांनी कोणत्या ठिकाणी हत्या केली, याविषयीचे तथ्य पुन्हा जाणून घेतले.नियमित चौकशी व कर्तव्याचा भाग म्हणून शीतल पाटील हत्याकांडाविषयी आढावा घेतला. त्यामध्ये पोलिसांचा तपास समाधानकारक वाटला. त्या अनुषंगाने पोलीस अधिकाºयांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.- रणजित पाटीलगृहराज्यमंत्री.